(मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
24 Jun 2019 - 11:08 am

जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो.

टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये

मिपा हे दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे,

विझलेल्या धाग्याला, डु आयडी ने फोडणी,
प्रतिसादास्तव आसूसलेले, टुकार लेख अन चर्चा,
मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे,

लेखांच्या या बाजारातून प्रतिसांदांची दाटी,
आणि म्हणावे दर्जा ठरवी शतकाच्या या गाठी,
रोजच यावे, धागे चाळावे, धरुन आशा खोटी,
जावे मिटूनी आशाळ भुतापरी, पुन्हा उघडण्यासाठी,
मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे

अर्थपूर्ण त्या, प्रतिसादाची दिवा स्वप्ने पहाताना,
कुणीतरी यावे हळूच धाग्यावर, ध्यानी मनी नसताना,
नकळत आपण फसून जावे, निरागस प्रष्णांना,
अन मग डोळे उघडून जावे, आयडी ब्लॉक होताना,
मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे

भुतकाळाचा करीत उल्लेख, गोंधळ घातला त्यांनी,
आणि पेटवला उगाच धागा, खोट्या अस्मितांनी,
भविष्यात इथे न लिहिण्याचा, निर्णय अनेकांनी केला,
गालावरती हाणत चापट्या, स्वतःच्याच हातांनी,
मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे

पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालगीतकालवणकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

नाखु's picture

24 Jun 2019 - 11:27 am | नाखु

आणि बाराच्या भावात!!!
जबराट आहे

अखिल मिपा आशययुक्त शिवार आणि मनोरंजक फळबाग लागवड वाचक समितीचा जाहीर पाठींबा.

भूतकाळाचे व्याज आयुष्यभर पुरत नाही,नव्या मुद्दलाची तजवीज करावीच लागते.

समर्पक वाक्य "भूतकाळाचे व्याज आयुष्भर पुरत नाही,"
पूर्वी मिपा वर दर्जेदार लेखन होते आणि प्रतिसाद सुद्धा दर्जेदार असायचे हे किती दिवस आठवणार .
नवीन लोक लिहीत आहेत प्रतिसाद देत आहेत .
चुकत असतील,दर्जा कमी असेल पण काय सांगावं ह्या मधूनच उद्या दर्जेदार लेखक तयार होतील .

महासंग्राम's picture

24 Jun 2019 - 12:29 pm | महासंग्राम

१० वर्षे इतके मिपा वय असलेले अकुकाका मुद्दामहून भाषेची आयमाय करतात त्याला काय म्हणणार आपण ?

जॉनविक्क's picture

24 Jun 2019 - 1:35 pm | जॉनविक्क

जुनं ते सोनं असतंच असं नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2019 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

मिपा हे, मिपाकरांचे, मिपाकरांनी, मिपाकरांसाठी, मुक्त लिखाण व संवादाचे साधन असल्याने, ते सर्व मिपाकरांचे एकत्रित प्रतिबिंब आहे.

आता हेच पहाना, इतक्या चांगल्या विडंबनासारखे लिखाण असलेल्या मिपाबद्दल, "मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे", असे कसे म्हणता येईल ?! :)

उत्तम गुलाबाच्या फुलात एखादी कीड दिसली, तर तिला झटकून टाकावे, आणि फुलाच्या सौंदर्य-सुगंधाचा आस्वाद घेत रहावे. ;) :)

चौकटराजा's picture

24 Jun 2019 - 7:02 pm | चौकटराजा

एखाद्या रसिल्या धाग्यात सुद्धा एखादा ट्रोलिंग करताना दिसतो म्हणू मिपा सोडायचं व्हय ?

४५००० गद्य/काव्य पुष्पांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मिपावरचे हे ४४७२४ वे पुष्प आवडले!

वकील साहेब's picture

25 Jun 2019 - 2:27 pm | वकील साहेब

नेमके भाव ते मनीचे पकडले.

दर्जेदार लेखन माझ्या मते
जे सध्य परिस्थितीचे योग्य वर्णन करते .

जालिम लोशन's picture

26 Jun 2019 - 12:42 am | जालिम लोशन

भावना पोचली.

जे वाचता क्षणी त्यासाठी घालवत असलेल्या वेळेचे सार्थक झाल्याचा भाव आपोआप निर्माण करते.

पैजार ज्ञानोबांच्या शोधात?

खिलजि's picture

29 Jun 2019 - 4:24 pm | खिलजि

जबराव जबराव जबराव

आवडेश भारी आवडेश