हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी.
ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे
त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे
गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी
गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे
घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण
घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे
शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत
उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे
तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच,
हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे
वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किंवा २ बीएच के फ्लॅट
कार पार्किंग सकट विकत किंवा भाड्याने पाहिजे,
वृध्दाश्रमासाठी सेविका (८ जागा), व्यवस्थापिका,
ड्रायव्हर व स्वयंपाकी पाहिजे,
नामांकित बँकेच्या कामा साठी, १० वी १२ वी पास / नापास
मुले मुली, व टिमलिडर पाहिजे,
आणि शेवटी....
लग्न करायचे आहे, एक सुस्वरूप आणि संस्कारी मुलगी पाहिजे
बाकी ती कशी असावी याची चर्चा खाजगीत करू, इकडे नको,
इकडे (स्वयंघोषित) सुधारणावाद्यांना दुसर्यावर हल्ला करायचे काहीतरी निमित्त पाहिजे
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
2 Apr 2019 - 12:28 pm | यशोधरा
मिळतेच मिपावर दादही भन्नाटशी
विडंबन मात्र कचकून जमले पाहिजे!!
2 Apr 2019 - 1:29 pm | प्रचेतस
बुवा सध्या सॉलिड फोर्ममध्ये आहेत.
2 Apr 2019 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीचेच यशस्वी... पैजारबुवा ! =))
2 Apr 2019 - 2:33 pm | अन्या बुद्धे
जमतंय जमतंय! :)
3 Apr 2019 - 2:19 am | सोन्या बागलाणकर
कविता भन्नाट जमलीये, पैजारबुवा!
पण हे खाली वर्गीकरण मध्ये काय काय आहे?
3 Apr 2019 - 4:11 am | पाषाणभेद
तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ
गझलेत काही राम नाही
विडंबन!