(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)
बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप...
सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!
अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली
हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप !
केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला
उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप !
शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?,
मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप !
कुरकुरीत चुर्यावरी, पिठूर चूर्ण पांघरु...
उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप!
तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते
हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप !