(नोटा)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 Dec 2017 - 2:17 pm

पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी?

चालः- गे मायभू तुझे मी

नोटा

नोटा कितीक असती
हजार पाचशेच्या
नाही कुणास मुल्य
कागद वाटती साऱ्या

दूरस्थ आयकर विभाग
ठाऊक पाहतो मजला
डोळ्यांत् कॅशियरच्या
अनुकंप दाटलेला

झालो विवश परंतु
बोलणार काही नाही
निःशब्द भावनांना
होळीच साक्षी राही

अत्यंत भित्रे
08112016
पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडइतिहासबालकथाआईस्क्रीमऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

12 Dec 2017 - 2:21 pm | पगला गजोधर

:)

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 2:35 pm | टवाळ कार्टा

=))
यानंतर लोटा, खाटा असेही येउंदे ;)

नाखु's picture

12 Dec 2017 - 10:30 pm | नाखु

बुवा कॉपीराइट​ असल्याने खाटेवर दिवटे किंवा अकुकाकाच काव्य प्रतिभा दाखवू शकतील

पैजारबुवांनी खंत आणि भिती समतोल ठेवलीय,मूळ कवीच्या खिलाडूवृत्ती ला दाद

मतदानातही नोटा वापरणारा नाखु पांढरपेशा

प्रचेतस's picture

13 Dec 2017 - 8:43 am | प्रचेतस

=)) =)) =))

प्रचेतस's picture

13 Dec 2017 - 8:47 am | प्रचेतस

बुवा, अता एखादं शीघ्रकाव्य येऊ द्या.

एस's picture

12 Dec 2017 - 3:43 pm | एस

हाहाहाहा!

हे पण "अय दिल मुझे बता दे तू किसपे आगया है" च्या चालीवर म्हणता येतंय की.
भारीच हो पैजारमावली.

तिमा's picture

12 Dec 2017 - 10:10 pm | तिमा

'एका तळ्यांत होती' च्या मीटरमधे पण बसतंय राव.

पद्मश्री चित्रे's picture

12 Dec 2017 - 8:25 pm | पद्मश्री चित्रे

दूरस्थ आयकर विभाग ... आवडलं!
या निमित्ताने तरी तुम्ही माझ्या कवितेची दखल घेतली.. हे ही नसे थोडके!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

आता जुन्या झालेल्या नोटाबंदीबद्दल आहे होय ही कविता ? शीर्षक वाचून, ती गरमागरम ताज्या निवडणूकीतील नोटा (NOTA उर्फ None Of The Above) बद्दल असावी असे वाटले होते :) ;)

Secret Stranger's picture

20 Jul 2018 - 1:15 pm | Secret Stranger

खूप छान..