आत्मताडनाची कविता लिहू नये...
यात होते असे,
कि आत्मा सोडून
बाकी सगळे दुखावतात
यात काय हशील आहे, सांग!
काय कामाची असली कविता?
माणूस जोडत नाही, ती कविता नाही
ही घे चिकन बिर्याणी,
तुला सांगतो,
कविता म्हणजे बिर्याणी
मसालेदार, स्वादिष्ट!
बोन प्लेट तयार ठेवायची
होय, होय... तसेच होते..
आत्मताडनाच्या कविता शेवटी
बोनप्लेट मध्येच पडतात...
मी म्हणतो,
मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन?
कशाला?
तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण
उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा...
कशासाठी म्हणतो मी? कशासाठी?
सुख टोचते राव तुम्हा लोकांना
बिर्याणी खावी सर्वांगाने .....!
बस्स, तेवढी एक
आत्मताडनाची कविता लिहू नये....
-शिवकन्या
प्रतिक्रिया
22 Apr 2018 - 8:54 pm | गब्रिएल
ब्येस ! आत्म्ताडन शिलेक्टिव का काय त्ये म्हंत्यात ना त्ये आसू नये, बास. नाय्तर त्येला येगळास बास येतोय बगा.