।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)
तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती
तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती
अग्निरथी तू दुग्धदायिनी,
तुलाच नमितो कपूर राजीव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
"बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव
स्नानार्थं जलपातगामिनी
तुझ्या पल्लुचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या दर्शने शांत गळाले
प्रणयसंगम तूनळी रंजन
तिथेच फिरते चक्र निरंतन
विशालसुंदर आम्र निरंतर
तिथे विरावे माझे अंतर