गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
12 Sep 2015 - 12:24 am

कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला

न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने

त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष
जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस
अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो
पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो.
ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो
पण माझाही पाय इतिहासात अडकलाय
हे मी विसरूनच जातो.
आज करावयाची निर्मीती सर्जन आणि उत्पादन
मी विसरूनच जातो.
त्यांनी चुकीची दिशा दाखवली
हे सांगण्याच्या नादात
मी स्वतःची दिशा
स्वतः शोधायची
हे विसरुनच जातो.
धर्माच्या नावावर
मनशत्रु द्युत खेळण्यास सांगतो
म्हणून ओम-होम फूटफटी खेळायची
की दुष्काळात गोदावरीला
दिशा देणारा एका गौतमाने जगलेला
कर्म सिद्धांत निवडायचा की
अथवा स्वयंप्रकाशित होण्यास
सांगणार्‍या दुसर्‍या गौतमापासून
प्रेरणा घ्यायची ? मृगजळाच्या
अथवा आयत्या सुवर्ण मृगाच्या मागे
न धावणारी चांगली प्रेरणा
कोणत्याही गौतमापासून घ्या
लक्ष्य मूख्य ध्येयावर केंद्रीत
करा म्हणजे झाले
शत्रुपक्षाने टाकलेल्या
द्युताच्या खोट्या फाशांशी
खेळत नका बसू म्हणजे झाले
कोणत्याच गौतमींवर अन्याय
नका करु म्हणजे झाले.
गंड अहमाचा असो अथवा
गंड न्यूनाचा असो, गंड
दोन्ही प्रकारचे सोडले
म्हणजे झाले.

-प्रेरणा दायी हम्मा
(आम्ही प्रेरणा देतो :) )

अभय-काव्यकविता माझीकाणकोणकालगंगाकॉकटेल रेसिपीप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितास्वरकाफियावीररसकवितामुक्तकविडंबन