दूर तू दूर मी
दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले
का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले
गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले
का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले
जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।