एक साधी सरळ प्रेम कहाणी
जोश्यांच्या बि~हाडात आली होती पाहुणी गोडशी
सुटी म्हणून आली होती, कळले करता चौकशी
.
उतरताना जिना मित्रांनो, भिडली नजरेस नजर
गोडसा चेहरा, नजर धारधार, केला हृदयावर वार
.
काकांच्या घरात उठबस ,जरा जादा वाढू लागली
दांड्या मारता म्हणून ऑफिसात, बोंब होऊ लागली
.
मधाळ वाणीत तिच्या, नागपूरच्या गप्पा रंगू लागल्या
मात्र " भेटत नाही" म्हणून दोस्तांच्या शिव्या खाल्ल्या
.
विचारले आवडले का पुणे ,की बरे आपले नागपूर ?
हसून वदली आवडले पुणे व पुणेकर, नको नागपूर
.
मग ति नागपूर ची कन्या पक्की पुणेकरीण झाली
साधी सरळ प्रेम कहाणी मित्रांनो अशी संपन्नं झाली
.
अविनाश
प्रतिक्रिया
4 Nov 2015 - 10:15 pm | माम्लेदारचा पन्खा
अरे कुठे फेडाल ही पापं?
4 Nov 2015 - 10:47 pm | पीके
ते समदे तुमच्याच धाग्यावं एक्मेकांचे कौतीक करुन र्हायले ना....
23 Nov 2015 - 9:18 pm | टवाळ कार्टा
खिक्क
24 Nov 2015 - 7:08 am | मांत्रिक
सहमत मापं.
अक्कुकाका आवडली कविता.
23 Nov 2015 - 8:33 pm | माहीराज
जिंकलत नागपुरकरांना ...वा छान
24 Nov 2015 - 8:32 am | अत्रे
शहर जिहाद!