.... आभास
केवळ शब्द भारलेले
इकडून तिकडे वाहणारे
तिकडून इकडे झरणारे......
कुणाकुणाचे संचित असते
क्षणामनाला जाणिव देते
प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न!
भास नसे हा खास तरीही
आभासाच्या जगात फिरते
गूज मनाचे मनास वदते.
इतक्या रुतल्या गाठी रेशीम
व्रणही वाटे जपून ठेवू
नशिबाला मग कौलच लावू
दिगंताला निघताना तरी,
हात खराच हाती घेऊ!