प्रेमकाव्य

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

नजर

सुर्या गार्डी's picture
सुर्या गार्डी in जे न देखे रवी...
3 Dec 2014 - 11:23 pm

नजरेला नजर बांधून
डोळ्यांनीच नुसतं पाहणं तुझं,
न बोलूनही सांगतं सारं काही।।

जाता जाता मिश्किल हसून
ओठांवर नजर खिळवणं तुझं,
प्रीतीचं रोमांच फुलवतात किती।।

चालता चालता थबकून
मागे वळून पाहणं तुझं,
चोरून चोरून पाहण अन्
गालातल्या गालात हसणं तुझं
ह्रद्याच्या तारा छेडतात किती।।

दूरवर जावूनही नजरेनं
शोधत राहणं तुझं
अन् रोज रात्री स्वप्नात येवून
प्रेम गीतं शिकवणं तुझं
गीताला सुरांची देतात प्रीती।।

प्रेमकाव्य

"अर्थ"

दिपक विठ्ठल ठुबे's picture
दिपक विठ्ठल ठुबे in जे न देखे रवी...
1 Dec 2014 - 5:51 pm

शब्दांत गुंफले मी
हळुवार जाणिवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||धृ||

मज स्मरणात आज ही रे
ती संध्या भारलेली
संग लाभला तुझा अन
काय माझी मोहरली

जणू चैत्र वणवा विझावा
वळवाच्या सरींनी भिजताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||१||

हे बंध जे जगाचे
पायात घोळणारे
माझी अबोल प्रीती
जणू भिन्न दोन्ही किनारे

दिसतो तुझाच चेहरा
माझे प्रतिबिंब पाहताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||२||

मराठी गझलकविताप्रेमकाव्य

हाबिणंदण

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
1 Dec 2014 - 10:51 am

आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625

"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!

काहीच्या काही कविताहास्यकविताचारोळ्याप्रेमकाव्यविडंबनमौजमजा

तिची साधीशी कविता

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
25 Nov 2014 - 7:28 pm

तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |

तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |

तिची साधीशी कविता
म्हणे तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |

तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |

तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !!

( पुर्वप्रकाशित )

प्रेमकाव्य

क्षण तो.....

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
22 Nov 2014 - 12:28 pm

नाही विसरलो तुझं
मला ओलांडूनी जाणं,
जाता जाता मनाचं
इतकं कठोर होणं !!

कालपर्यंत दोघांचं
एकच होतं जीणं,
एका वळणावर मात्र
त्या हाताचं झिडकारणं !!

गैरसमज क्षुद्र तरीही
जीवाचं करतो मागणं,
आयुष्यच शून्य होईल गं
तुला करता उणं !!

तेही आठवतात क्षण
तुझं उचंबळून येणं,
आसू हासुच्या आठवांत
गंध वर्षावूनी जाणं !!

ते तुझं चालता चालता बोलणं
बोलता बोलता हसणं,
गालामधल्या खळीमध्ये
माझ्या मनाचं बसणं !!

करुणप्रेमकाव्य

कोवळा हुंकार

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 1:13 pm

नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू

कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं
अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं

दोन ठोकर खात मला माझं संपवावं
रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं

नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं
प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं

वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत.

मांडणीकविताप्रेमकाव्यभाषाप्रकटनप्रतिसादआस्वादलेखअनुभवमत

एकांत

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
17 Nov 2014 - 10:27 am

तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला
गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ll १ ll

सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला
अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ll २ ll

चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला
तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ll ३ ll

कधी नीज लागली, न कळे मुळी मला
सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ll ४ ll

जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला
श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ll ५ ll

कविताप्रेमकाव्य

तुझी सोबत.......

माझं आभाळ's picture
माझं आभाळ in जे न देखे रवी...
31 Oct 2014 - 1:44 pm

तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,

तुझी सोबत.......
आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली

प्रेमकाव्य

घेऊन जा

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in जे न देखे रवी...
31 Oct 2014 - 10:22 am

गंध मातीत, पहिल्या सरीत
भिजल्या रानात, घेऊन जा ||

श्रावणसरीत, रंगल्या नभात
सोनेरी उन्हात, घेऊन जा ||

साजणवेळात, भिजल्या क्षणात
रंगल्या गाण्यात, घेऊन जा ||

चिंब रातीत, मंद ज्योतीत
धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||

शृंगारप्रेमकाव्य