प्रेमाची कहाणी
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो ।
बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।।
प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी ।
संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।।
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात ।
जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।।
प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत ।
कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।।
कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई ।
कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।।
भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले ।
"ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।।