स्पंदन

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
27 May 2014 - 6:40 pm

कधी चांदणं श्वासात
कधी मन चांदण्यात
धुंद प्रेमाचं उधाणं
तुझ्या माझ्या अंतरात ll १ ll

तुझा भास जीवनात
तुझी आस हृदयात
तुला पाहिले डोळ्यात
जसा मोती शिंपल्यात ll २ ll

वारा भरून वाहत
पान फूल बहरत
तुझा हाती येता हात
तन मन मोहरत ll ३ ll

तुझे असणे माझ्यात
जीव तुझ्यात गुंतत
तुझे सांगतो अस्तित्व
श्वास श्वास स्पंदनात ll ४ ll

- सार्थबोध
www.saarthbodh.com

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

27 May 2014 - 9:16 pm | विवेकपटाईत

आवडली