मंतरलेली रात्र
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली
आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही
युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो
त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो
ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही
पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही
लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली
संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली
शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले
अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले