कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर...
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण कोरडा उरलास का रे ?
***************************************
गलित आहे गात्र अजुनी, लाडके अवधी जरा दे
एवढ्यातच पुनर्प्रत्यय मागशी, देऊ कसा गे?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन उरली रात्र अवघी, का न धरीशी धीर जरा गे?
बघ अजून पुसतोच आहे पाठीवरचा घाम सारा
कोरडा पडला घसा अन् प्राणही कंठाशी आले
सांग, ह्या आतुरल्या मुखचंद्रम्याला काय देऊ?
सुकून गेले ओठ, आता थोडका 'सूकून' दे गे
प्रेमरंगी खेळता, घाई सखे नाही बरी गे
दोन डावां अंतरी, थोडीतरी टँप्लिज दे गे
- कवि चिमिचांगेश खट
प्रतिक्रिया
8 Feb 2015 - 12:40 am | टिल्लू
छान.
बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)
8 Feb 2015 - 6:33 am | चिमिचांगा
छान.
आता 'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' चा भावार्थ सांगा पाहू!
8 Feb 2015 - 8:24 am | अत्रन्गि पाउस
ह्यले म्ह्न्ता काकद्रुश्ति
8 Feb 2015 - 5:22 am | खटपट्या
चांगलीय,
चांगेश...
8 Feb 2015 - 6:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटच्या दोन ओळीनी गहिवरून आलं !
एकच डाव पण झकास झाला तर कशाला
ट्यामप्लीज लागेल म्हणतो मी ?
-दिलीप बिरुटे
8 Feb 2015 - 8:50 am | सस्नेह
सर अलिकडे गहिवरणं वारंवार होऊ लागलय तुमचं वेळीच दाखवून घ्या हो :-\
8 Feb 2015 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
8 Feb 2015 - 8:08 am | साती
मला तर चिमिचांगा वाचल्यावर 'चिमिचांगा सखे मिळाल्या' असं एक गाणं आठवतं नेहमी.
;)
9 Mar 2015 - 6:26 pm | कपिलमुनी
भारीच मॅच होत आहे
8 Feb 2015 - 8:46 am | अर्धवटराव
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.
8 Feb 2015 - 8:52 am | सस्नेह
+))
8 Feb 2015 - 8:51 am | पाषाणभेद
मिपाचे मोठे प्लेयर व्हाल असे भाकीत करतो.
8 Feb 2015 - 9:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))
8 Feb 2015 - 10:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बैद्यनाथची एक जाहिरात आठवली उगाचचं =))
8 Feb 2015 - 10:44 am | hitesh
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा
8 Feb 2015 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार
कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे.
तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे?
घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ?
अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या,
कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे?
सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ?
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?
बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या
एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे?
उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा,
ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे?
पैजारबुवा,
8 Feb 2015 - 11:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
8 Feb 2015 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा
@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ?
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))
8 Feb 2015 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
-दिलीप बिरुटे
8 Feb 2015 - 8:04 pm | चिमिचांगा
*lol*
बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)
9 Feb 2015 - 2:03 pm | बॅटमॅन
अगागागागा......म्हटले तर ठ्ठो विनोदी, पण तरीही करुण.
9 Feb 2015 - 2:23 pm | सूड
यु टु पैजारबुवा ?
8 Feb 2015 - 11:23 am | गवि
..स्वल्पवैराग्याचे उत्तम वर्णन.
..चिमीचांगा व्हेज पण असतो का? ;)
8 Feb 2015 - 2:06 pm | जेपी
=))
8 Feb 2015 - 2:48 pm | धडपड्या
9 Feb 2015 - 6:05 am | चौकटराजा
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .
9 Feb 2015 - 2:00 pm | बाबा पाटील
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:
10 Feb 2015 - 12:27 am | टवाळ कार्टा
ते पण चांदीच्या पेल्यातून ;)
9 Feb 2015 - 2:20 pm | सूड
आवडलं नाही.
हे विडंबन वाचून बघा.
18 Feb 2015 - 7:56 am | अत्रन्गि पाउस
बीभत्सरसोत्कर्षसीमा झाली म्हणतो मी .... मानले बुवा !!!
9 Mar 2015 - 6:21 pm | एक एकटा एकटाच
अशक्य आहात सगळे
चिमीचांगा
आणि
पैजारबुवा देखिल...........
जबरदस्त