तो आणि ती

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
20 Feb 2015 - 10:46 am

दोघांनाही पाउस आवडतो;
त्याला खिडकीतुन तिला गच्चितुन...

दोघांनाही थंडी आवडते;
त्याला दुलईतुन... तिला धुक्यातून....

मंद हलके गझलचे सुर...
त्याच्या खोलीतुन.... तिच्या गाडीतून...

पावसाळी संध्याकाळची गरम भजी...
त्याला स्वयंपाकघरातून... तिला टपरीतुन... ठेल्यातुन...

मॉल मधल shopping त्याच!
रोडसाइडवर प्रेम तिच....

5star च dinner? चल घेऊ दोघे आपण...
पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण?

तरीही....
तिच मोहक हसण...
आणि त्याच अजूनही... अह...
कायमच... घायाळ होण....

भावकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

22 Feb 2015 - 5:50 pm | विवेकपटाईत

काही तरी गडबड आहे, हे कदाचित उचित ठरेल....
मॉल मधल shopping तिची
रोडसाइडवर प्रेम त्याचे ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2015 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येऊ दे अजुन

-दिलीप बिरुटे

विशाखा पाटील's picture

22 Feb 2015 - 7:19 pm | विशाखा पाटील

हं, अजून एक मिंग्लिश कविता...

@ विवेक पटाईत, तसा बदल केल्यास कवीला पुढच्या ओळींचा क्रम बदलावावा लागेल -

पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण?
5star च dinner? चल घेऊ दोघे आपण...

वेल्लाभट's picture

24 Feb 2015 - 11:12 am | वेल्लाभट

जमलीय !!!!

मितान's picture

24 Feb 2015 - 11:59 am | मितान

बरं.

गवि's picture

24 Feb 2015 - 12:21 pm | गवि

वॉव..!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2015 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा

मी काय म्हणतो?.... नै..पण तुंम्ही एकदा जायफळ-घ्याच कॉफितून

आदूबाळ's picture

24 Feb 2015 - 12:58 pm | आदूबाळ

अह...