एकटा जगी मी उरलो
ज्या नात्यांच्या भरवश्यावर
स्वप्नांचे मी बांधले इमले
त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले
धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी
माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी
ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास
उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास
आधार ज्यांचा धरूनी उठावे
ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले
आपले विश्व तू एकट्या ने विसरावे
नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले
विश्वास ठेवावा तरी कुणावर
जगी माझे कुणीच नाही उरले
आपलेसे केले ज्यांना तेच
माझ्या जीवावर उठले