वर्तुळ-कोन सिद्धांत
"
"
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
पावसाला बोलवायला हवे आता
-------
तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना
तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर
कोरली होतीस
त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या
चक्रव्युहात अभिमन्यु झाला
होता माझा...
-------
अंगणातला पारिजातकही आता फारच
काकुळतीला आला आहे
तुला आठवतं?
पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
.
.
खरचं पावसाला बोलवायला हवे आता
-------
कोसळणाऱ्या धारांमध्ये
खिडकीतुन हात बाहेर काढून
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता
अगदी नेहमीसारखेच
आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो
अगदी नेहमीसारखेच
कोणी किती गहरे असावे?
किती अलंकार शोधावे उपमांसाठी
किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी
कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी
कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी
न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे?
बोलायला मनातले
एस.एम.एस. ची सोय नव्हती
रुपया टाकून फोन करु तर
गर्दी होती अवती भवती
नाक्यावरला वाणी होता
दोघांमधला दूत
त्याच्या करवी जमवत होतो
तुझ्याशी मी सूत
वारंवार पावलं तेव्हा
दुकानाकडे वळायची
मी तेथे आल्याची वार्ता
तुला कशी कळायची
काहीतरी निमित्त काढून
तू ही तिथे यायचीस
समोरून येता जाता
वळून गोड हसायचीस
पुढे एकदा चोरुन चोरुन
तयार एक पत्र केले
खात्री होती, ओळखशील तू
म्हणून नांव नाही लिहिले
'तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - '
--विचारून माझ्या प्रेमाचा
का अपमान करतोस रे.....
वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर
तू सावरलेल्या माझ्या
चेहऱ्यावरच्या अवखळ बटा...
सागरतीरी मी वाळूत
ओढलेल्या रेघोट्यावर
तुझे अलगद फिरलेले बोट...
ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे
तू आपल्या ओठांनी टिपून
घेतलेला पावसाचा एकेक थेंब...
क्याफेतल्या उष्टावलेल्या
कॉफीच्या मग धरलेल्या
माझ्या हातावर तो हळूच
फिरलेला तुझा हात ...
डोळ्यात डोळे घालून
अगणित काळापर्यंत
पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ...
3
3
3
3