नविनच
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा