तू गेलीस मला सोडून....

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
7 Nov 2013 - 12:47 am

तू गेलीस मला सोडून
म्हणून मी जगायचं थांबलो नाही
तू लांबवलंस मला तुझ्यापासून
म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही
तरी पुढे करायचं काय ते कळेना मला
माझंच मेलेलं मन मिळेना मला
मन कुठेतरी हरवलं होतं,
आणि काय करायचं ते वेंधळ्यासारखं
मी मनातल्या मनातच ठरवलं होतं
काय करायचं होतं आयुष्यात ते मला आठवेना
मेंदू बधिर झाला माझा, एकही ऑर्डर पाठवेना
कल्पकता मेली माझी, डोळे मिटले की तू दिसायचीस
स्वप्नांनाही कंटाळलो मी, कारण त्यांतही तूच असायचीस
मी हसलो, की तुझं हसू आठवायचं
मी रडलो, तरी तुझं हसूच आठवायचं
तुझ्या डोळ्यातली आसवं मला ना कधी बघवत होती
तुझ्या हस-या चेह-याची आठवणच मला जगवत होती.
तू भांडायचीस तेव्हा मी चिडायचो
मी चिडलो, की तुलाही पिडायचो
मूड तुझा सदैव रोमॅन्टिक दिसायचा
प्रेमाचा वर्षाव जायगँटिक असायचा
मी जरी कामात स्वतःला रखडून घेतलं होतं
तरी प्रेमाच्या पाशात तुझ्या जखडून घेतलं होतं
लाजाळूशा शेमेत, सोनेरी अशा हेमेत,
खेळकरशा गेमात, प्रेमळ अशा प्रेमात,
तू मला कायमचं गुंफून टाकलं होतंस
कधीही न संपणा-या जीवनाच्या मैलावर
माझ्यासारख्या या अगदी अरसिक बैलावर
प्रेमाचं औतं तू जुंपून टाकलं होतंस
बदललीस कशी अशी अचानक तू
प्रेमाची राक्षसी भयानक तू
मला विसरलीस मला सोडलंस
त्याच्यावर भाळून त्याला धरलंस,
माझ्यावर केलेलं वेडंखुळं प्रेम
जाऊन तू त्याच्या साच्यात भरलंस
आणि आज अशी एकदम मला आडवी आलीयस तू
त्या गाढवावर प्रेम करून गाढवी झालीयस तू
आज त्यादिवसापेक्षा कितीतरी गोड वागत्येस
दुसरी संधी निलाजरेपणे माझ्याकडे मागत्येस
कल्पना तरी आहे का मनाला
माझ्या किती पडल्यात भेगा
खैर आजा वापस कातिल-ए-दिल,
तू भी क्या याद रखेगा!!

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

झंम्प्या's picture

11 Nov 2013 - 7:00 pm | झंम्प्या

भारी लिहिलीय राव. पण शेवट मात्र पटला नाही मित्रा. तिला तिची जागा दाखवायलाच हवी होती, पण भले. मनाचा मोठेपणा म्हण की जित्याची खोड म्हण, शेवटी पुन्हा मागचे पाढे पाच.

कवितानागेश's picture

11 Nov 2013 - 11:59 pm | कवितानागेश

अजून काव्यत्मकता आणता आली असती.
तू लांबवलंस मला तुझ्यापासून
म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही

या २ ओळी जरा गंडल्या आहेत. लांबवलस ऐवजी दुरावलंस / तोडलंस असं चालेल. आणि लांबलो ऐवजी तुटलो...

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2013 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर

तू लांबवलंस मला तुझ्यापासून
म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही

निर्माण केलास तू दुरावा आपल्यात
नाही दुरावलो पण तुझ्यापासून मी.