होतीच तशी वेळ, तिचं बोलावणं आलं होतं
सगळी कामे दूर सारुन ,जाणं भागच होतं
ठरवलेल्या ठिकाणी ,वेळेआधीच गेलो
कोपर्यात एका, तिची वाट बघत उभा राहिलो
इतक्यात नजर समोर गेली आणि मनाची खुण पटली
इंद्रधनुषी रंग फुलवत,माझ्याकडे ती आली
सुचेना काय बोलु, सुरुवात तिनेच केली
काहीतरी चुकत होते, गालावर तिच्या नव्हती लाली
संपताच तिचे बोलणे,पाठ फिरवुन गेली
दूर जाणारी पावले,अश्रुंनी दिसेनाशी झाली
आणि काय सांगू,बाजुने वाहता रस्ता
मध्ये सुन्न होउन, मी उभा नुसता
प्रतिक्रिया
8 Nov 2013 - 2:05 pm | हरवलेला
आवडली
8 Nov 2013 - 3:37 pm | पैसा
मिपावर पहिलीच कविता दिसते आहे. रचना आवडली.