जपू एकट्याने घडी जीवनाची...

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
6 Nov 2013 - 8:16 pm

नको ओढ ती रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची
नको फार गुंता आता जीवनात
नको अडकणे रे कुणात,कशात

पुरे जाहले रोज झुरणे अवेळी
पुरे जाहले आठवांचे उसासे
तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे
आता सावरू दे मनाला जरासे

कधी बंध तुटले,कळलेच नाही
मला तू,तुला मी उमगलेच नाही
आता ओढ अश्रूंत वाहून गेली
सुखाची मनाशी चुकामूक झाली

गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे
क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे
आता ना तमा रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची...

© अदिती

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Nov 2013 - 10:46 pm | पैसा

कविता आवडली.

अमेय६३७७'s picture

6 Nov 2013 - 10:57 pm | अमेय६३७७

छान आशय. अजून जरा लक्ष दिले तर उत्तम भुजंगप्रयात वृत्तात बसू शकेल (मनाचे श्लोक ज्या फॉर्म मध्ये आहेत ते). आत्ताही कवितेतील अनेक ओळी सहजपणे वृत्तात आलेल्याच आहेत.
शुभेच्छा :)

psajid's picture

7 Nov 2013 - 12:38 pm | psajid

सुरेख कविता, आवडली

आनंदमयी's picture

7 Nov 2013 - 1:21 pm | आनंदमयी

धन्यवाद

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Nov 2013 - 6:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर..

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2013 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा

वाचता वाचता एकदम, "प्रीया आज माझी,नसे साथ द्याया" हे बाबूजिंच्या आवाजातलं गाणं अठवलं...

अमेय६३७७'s picture

7 Nov 2013 - 9:41 pm | अमेय६३७७

मलाही, म्हणूनच मी वर भुजंगप्रयातबद्दल म्हंटलंय. यशवंत देव यांनी स्वतः लिहिलेले आणि अर्थातच बाबुजींनी गायलेले हे गाणेही याच वृत्तात आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Nov 2013 - 9:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

कविता आवडली...पुलेशु

सूड's picture

7 Nov 2013 - 10:00 pm | सूड

आवड्ले !!

आनंदमयी's picture

8 Nov 2013 - 12:19 am | आनंदमयी

सूड, राजेंद्र मेहेंदळे, अत्रुप्त आत्मा, मिसळलेला काव्यप्रेमी...
खूप खूप धन्यवाद!!

अमेय६३७७,
धन्यवाद...! मी ही कविता (संदीप खरेच्या 'प्रिये ये निघोनी' या कवितेवरून इन्स्पायर होवून) मनाच्या श्लोकांच्या फॉर्ममध्येच लिहिण्याचा प्रयत्न केलाय.. त्याला 'भुजंगप्रात्यय वृत्त' म्हणतात हे माहित नव्हतं.. या फॉर्ममध्ये/वृत्तात अधिकाधिक अचूकपणे मीटर साधून लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन..:)

उद्दाम's picture

8 Nov 2013 - 1:01 pm | उद्दाम

भुजंगप्रयात वृत्तात आहे.

पढा है मेरी जा नजर से पढा है
बता मेरे चेहेरे पे क्या क्या लिखा है... :)

हरवलेला's picture

8 Nov 2013 - 1:37 pm | हरवलेला

आवडली

सुधीर's picture

8 Nov 2013 - 2:35 pm | सुधीर

कविता आवडली.

पद्मश्री चित्रे's picture

8 Nov 2013 - 3:05 pm | पद्मश्री चित्रे

आवडली खूप कविता

आनंदमयी's picture

8 Nov 2013 - 6:50 pm | आनंदमयी

धन्यवाद

रेवती's picture

8 Nov 2013 - 7:18 pm | रेवती

कविता आवडली.

>>>मला तू,तुला मी उमगलेच नाही
छान.
सुंदर गेय कविता. खरंच छान आहे.
(थोडा पाचकळपणा: प्रेमभंग झालेल्या हिरॉईनला भणंगदशेत साडेपाच मिनिट दाखवल्यावर तिनं सावरत सावरत हे गाणं मागं बॅक्ग्राऊंड ला वाजतंय. आहाहा. ;) )

drsunilahirrao's picture

11 Nov 2013 - 9:16 am | drsunilahirrao

छान !

झंम्प्या's picture

11 Nov 2013 - 9:27 am | झंम्प्या

कविता आवड्ली.

सर्वांचे अगदी मनापासून आभार __/\__

राघव's picture

27 Nov 2013 - 12:02 am | राघव

रचना आवडली! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2013 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

आनंदमयी's picture

27 Nov 2013 - 10:01 pm | आनंदमयी

:) धन्यवाद

इनिगोय's picture

6 Jan 2014 - 7:23 am | इनिगोय

वाह..!
क्षणांना उगा जाणीवांचे धपाटे! मस्त लिहिलंय.

आनंदमयी's picture

6 Jan 2014 - 11:04 am | आनंदमयी

:)
धन्यवाद

चिन्मय खंडागळे's picture

7 Jan 2014 - 9:09 pm | चिन्मय खंडागळे

अफलातून! (मात्र 'धपाटे' शब्द जरासा खडबडीत वाटला)
((डिस्क्लेमर-मला कवितेतलं काही कळत नाही))

राही's picture

7 Jan 2014 - 10:56 pm | राही

कविता आवडली. मलाही 'धपाटे' शब्द बाकीच्या शब्दयोजनेशी विसंगत वाटला.
जाता जाता : 'अम्ही चालवू हा पुढे वारसा' या गाण्याची आठवण आली. या चालीवरसुद्धा ही कविता बसवता येईल.

आनंदमयी's picture

9 Jan 2014 - 1:44 am | आनंदमयी

धन्यवाद
..........................................................