सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी
तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी
अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना
अजून सांज सावळ्या, शोधते तुझ्या खुणा
सुनी सुनीच वाहते सुनी नदी सुन्या तिरी
अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे
अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे
अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी
पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या
मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया!
कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी...
अदिती
प्रतिक्रिया
5 Jan 2014 - 7:52 pm | प्रचेतस
सुरेख.
बाकी शीर्षक पाहून 'गाढवाचं लग्न' मधील सावळ्या कुंभार आणि गंगी डोळ्यांसमोर तरळून गेले.
प्रकाश इनामदारांनी अजरामर केलंय सावळ्याला.
5 Jan 2014 - 7:52 pm | यशोधरा
वा, सुरेख!
5 Jan 2014 - 7:59 pm | किसन शिंदे
अतिशय सुरेख रचना. अगदी तालात म्हणून पाह्यली. :)
5 Jan 2014 - 8:10 pm | आनंदमयी
धन्यवाद! :)
.................................
5 Jan 2014 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा..व्वा..व्वा..व्वा..व्वा..!
5 Jan 2014 - 8:28 pm | आतिवास
आवडली.
मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया!
पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या
या दोन ओळींचा क्रम बदलून मला त्या अधिक परिणामकारक वाटल्या.
अवांतरः 'नदि' शब्द वृत्तासाठी असा घेतलाय का? तो थोडा खटकला - 'नदी' असा करता येईल का तो?
5 Jan 2014 - 8:45 pm | आनंदमयी
नाही तो टायपो होता. मलाही कविता पोस्ट केल्यावर लक्षात आलं.. पण पोस्ट एडिट कशी करायची ते कळत नाहीये..! :(
.........................................................
5 Jan 2014 - 9:41 pm | चाणक्य
एकदम नादमय झालीये. खूप आवडली
5 Jan 2014 - 10:53 pm | कवितानागेश
छान वाटतेय वाचताना.
5 Jan 2014 - 9:52 pm | प्यारे१
आवडली कविता.
5 Jan 2014 - 10:35 pm | आनंदमयी
धन्यवाद!! माझी कविता संपादित केल्याबद्दल...पण शेवटच्या कडव्यातल्या ओळींची रचना बदलणं अपेक्षित नव्हतं!! मला फक्त 'नदी'तला 'दि' दीर्घ करायचा होता...!!
5 Jan 2014 - 10:59 pm | किसन शिंदे
डन!
5 Jan 2014 - 11:02 pm | पैसा
फार छान!
5 Jan 2014 - 11:04 pm | आतिवास
माफ करा, आणखी एक,
'तिरी'चं 'तीरी' हवंय.
संपादकः दुरुस्ती केल्यावर (धागाकर्तीला ती दुरुस्ती मान्य असल्यास अर्थात) हा प्रतिसाद काढून टाका ही विनंती.
5 Jan 2014 - 11:11 pm | आनंदमयी
मीटर मध्ये बसावा म्हणून 'ति' ह्रस्व लिहिलाय.... :)
..........................................................
5 Jan 2014 - 11:08 pm | इन्दुसुता
अत्तिशय आवडली...
6 Jan 2014 - 1:04 am | मूकवाचक
+१
5 Jan 2014 - 11:13 pm | आनंदमयी
मनापासून धन्यवाद.... :)
6 Jan 2014 - 7:19 am | इनिगोय
तुमची कविता आणि तुमची स्वाक्षरी दोन्ही आवडल्या. अप्रतिम!
6 Jan 2014 - 10:16 am | अनुप ढेरे
कविता आवडली...
6 Jan 2014 - 11:08 am | आनंदमयी
:)
अगदी मनापासून
धन्यवाद.....
..........................................................
6 Jan 2014 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुंदर अतिशय सुंदर, मनापासून आवडली.
सहज गुणगुणता येते चालीत त्यामुळे लक्षातही रहाते आहे.
6 Jan 2014 - 1:55 pm | आनंदमयी
:) :) :)
धन्यवाद.....
.........................................................
6 Jan 2014 - 2:44 pm | michmadhura
कविता खूप आवडली.
6 Jan 2014 - 8:23 pm | पद्मश्री चित्रे
मला पण
6 Jan 2014 - 7:30 pm | आनंदमयी
:) धन्यवाद! :)
6 Jan 2014 - 7:39 pm | बापु देवकर
मनापासून आवडली..
6 Jan 2014 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख....अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
6 Jan 2014 - 8:15 pm | बॅटमॅन
खलास पूर्ण जाहलो, कवित्व येथ वाचता |
सुवृत्त काव्य, शब्दही, तसे अचूक योजिता |
मजा बहूत येतसे, पढोनि वा म्हणोनि वा |
कितीक दीस भासली, हिची जणूचि वानवा ||
6 Jan 2014 - 10:28 pm | आनंदमयी
खरेच धन्य जाहले सुनोनि काव्य कौतुके
वसोत स्नेहशब्द हे मनामनांत सारखे.... :) :)
6 Jan 2014 - 10:31 pm | आनंदमयी
अगदी मनापासून
धन्यवाद.....
..........................................................