'तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - '
--विचारून माझ्या प्रेमाचा
का अपमान करतोस रे.....
वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर
तू सावरलेल्या माझ्या
चेहऱ्यावरच्या अवखळ बटा...
सागरतीरी मी वाळूत
ओढलेल्या रेघोट्यावर
तुझे अलगद फिरलेले बोट...
ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे
तू आपल्या ओठांनी टिपून
घेतलेला पावसाचा एकेक थेंब...
क्याफेतल्या उष्टावलेल्या
कॉफीच्या मग धरलेल्या
माझ्या हातावर तो हळूच
फिरलेला तुझा हात ...
डोळ्यात डोळे घालून
अगणित काळापर्यंत
पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ...
माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या
एका कोपऱ्यात मी दडवलेल्या
त्या सगळ्या आठवणी ...
तू कधीच आपल्या मनाने
जाणून घ्यायला हव्यास -
मी तुला -
तू मला पहायला येशील
त्यावेळीच सगळयांसमोर
पण.. नकळत...
तुला कळेल,अशा अधोवदनाने
माझ्या प्रेमाची खात्री देईन-
तेव्हां तरी तुला
ठेवावाच लागेल
माझ्या प्रेमावर विश्वास !
.
प्रतिक्रिया
30 Jan 2013 - 10:08 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आवडली.