गोकुळ नसले तरी चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !
गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक राधा असावी !
कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!
प्रतिक्रिया
3 Apr 2014 - 3:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान प्रयत्न.
हे अगदी पटले:
पण हे नाही कळले:
पु.ले.शु.
3 Apr 2014 - 4:31 pm | स्पंदना
अहो मिका, ते "कर्मण्येवाधिकारस्ते..." हे पहिला राधेला ऐकवलं असावं ना हात सोडवुन घ्यायला...काय तुम्ही.
3 Apr 2014 - 4:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!
3 Apr 2014 - 4:03 pm | प्रचेतस
जयदेव जयदेव.
3 Apr 2014 - 8:22 pm | कवितानागेश
चांगला प्रयत्न आहे.