एकटा जगी मी उरलो

निलरंजन's picture
निलरंजन in जे न देखे रवी...
3 Apr 2014 - 11:41 pm

ज्या नात्यांच्या भरवश्यावर
स्वप्नांचे मी बांधले इमले
त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले

धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी
माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी

ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास
उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास

आधार ज्यांचा धरूनी उठावे
ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले
आपले विश्व तू एकट्या ने विसरावे
नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले

विश्वास ठेवावा तरी कुणावर
जगी माझे कुणीच नाही उरले
आपलेसे केले ज्यांना तेच
माझ्या जीवावर उठले

जळते निखारे पदरी टाकून
हृदय पेटवून ते गेले
काडी टाकून अविश्वासाची
अपकार कराया न विसरले

संपली आशा उद्याची
नयनांचेही बांध फुटले
खंजीर खूपसून पाठीत
वार करत ते निसटले

नशिबाचेही फासे उलटले
उर बडवून उगाच फिरलो
काय करू न कसे करू
विश्वासहीन मागे उरलो

मोठी स्वप्नं खोटी आशा
दिशाहीन मी जगात ठरलो
धरून उराशी स्वप्नांना
पावलातही मी अडखळलो

सांत्वनाप्रेमकाव्यसमाज

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

3 Apr 2014 - 11:46 pm | आत्मशून्य

बेगड्या स्त्रिमुक्तीपेक्षा अतिशय भयंकर समस्येवर नेमकं बोट ठेवलयं.

निलरंजन's picture

4 Apr 2014 - 6:41 am | निलरंजन

धन्यवाद