कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)
नमस्कार,
या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या. त्यातील ३० कवींची अंतिम फेरी दिनांक ३० मार्च २०१४ रोजी, पुण्यातच सायंकाळी ५ ते ८ यावेळेत 'वेदशास्त्रोत्तेजक सभागृह', सारसबागेजवळ, सदाशिव पेठ येथे होणार आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
नेहमीप्रमाणेच निवडलेल्या ३० कवींचे काव्यसादरीकरण होणार आहे आणि त्यानंतर क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. यावर्षी उत्कृष्ठ काव्यलेखन आणि उत्कृष्ठ सादरीकरण अशी दोन बक्षिसे वाढविली आहेत. पुण्यातील साहित्य मंडळांशी संलग्नित आणि रंगत संगत प्रतिष्ठानचे अॅड. श्री. प्रमोदजी आडकर यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे.
धन्यवाद.
आपला,
अजय जोशी