नाझ ओ अंदाजसे कहते है के जीना होगा
जहर भी देते है तो कहते है पीना होगा
जब मै पीता हूं तो कहते है कि मरता भी नही
जब मै मरता हूं तो कहते हि जीना होगा
(प्राणप्रिय ) म्हणतात की आपल्या वाट्याला काहीही आले तरी आनंदाने जगले पाहिजे. मग त्यानी विष दिले त म्हणतात 'तरी ते प्राशन केले पाहिजे.' .मग मी जर ते पिउन टाकले तर म्हणतात अरे मरत नाही हा अजून, अन खरंच मरू लागलो तर म्हणतात " जगायला हवं ! " ( काय करावं काही उलगडत नाही ! )
क्यू के इश्क इश्क , है इश्क इश्क
कारण एकच, हे प्रेम हे असंच असतं !
मजहब-ए-इश्क की हर रस्म कडी होती है
हर कदम पर कोई दीवार खडी होती है
इश्क आजाद है हिंदू ना मुसलमान है इश्क
आप ही धर्म है और आप ही ईमान है इश्क
जिसके आगे नही शैख ब्रह्मन दोनो
उस हकिकत का गरजता हुवा ऐलान है इश्क
प्रेम रूपी धर्मातील आचार संहिता फार कडक .ठायी ठायी अडचणींचे पहाड असणारच ! प्रेम स्वयंभू आहे.ते मुसलमान नाही अन हिंदूही. प्रेम स्वता: च एक धर्म आहे.एक निष्ठा आहे. हिंदू वा मुसलमान यातील धार्मिक व्यक्ति प्रेमापेक्षा मोठे नाहीत.
अहो या सत्याचा तेजस्वी उद्गार म्हण्जे प्रेम !
इश्क न पुच्छे दीन धरम नु इश्क न पुच्छे जाताँ
इशक दे हातो गरम लहूविच डूबियां लाख बराता के
( खरे) प्रेम कोणता धर्म ? कोणता संप्रदाय ? कोणती जात पात असे काही विचारत नाही. प्रेमाच्या नादात अनेक वराती
गरम रक्तात न्हाल्या आहेत.
क्युं के ये इशक इशक है , इश्क इश्क !
हे प्रेम असंच असतं अगदी असंच !
राह उल्फत की कठिन है इसे आसॉ न समझ
प्रेमाचा मार्ग मोठा खडतर हे असं हलकेच घ्यावा अशी बाब नाहीये.
क्युं के ये इशक इशक है , इश्क इश्क !
हे प्रेम असंच असतं अगदी असंच !
बहोत कठिन है डगर पनघटकी
अब क्या भर लाउं मैं जमुनासे मटकी
मै जो चली जल जमुना भरनको देखो सखीजी
मै जो चली जल जमुना भरनको
नंद किशोर मोहे रोके झाडो
अब क्या भर लाउं मै जमुनासे मटकी
अब लाज राखो मोरे घुंगटपट की
पाणवठ्याची वाट आहे मोठी बिकट. त्यात मी पाणी आणायला चालले तर खोडकर नंदपुत्र मला अडवतो.
आता मग सांगा कसा तो माठ मी पाण्याने भरून आणू ?.
( याचा एक अर्थ असाही असावा की प्रेमरूपी जल मिळविण्याची वाट तर कठीण .त्यात आपल्या मनातले खोडकर पण -परंतु वाटेत आडवे आले की मग ते प्रेम आपल्याला कसं मिळणार ? )
मग आता कुणीतरी माझ्या सत्वाचे रक्षण करो.
जब जब क्रिष्ण की बन्सी बाजी
निकली राधा सज के
जान अजान का मान भुलाके
लोक लाज तजके
जनक दुलारी बन बन डोली
पहनके प्रेमकी माला
दर्शन-जल की प्यासी मीरा
पी गयी विष का प्याला
और फिर अर्ज करी के
लाज राखो देखो देखो ....
जेंव्हा कृष्णाची बासरी वाजू लागली त्यावेळी राधा थटून निघाली. मान्य अमान्याचा विचार न करता. लोकापवादाची पर्वा
न करता. अशीच जनक कन्या ( लाडात वाढलेली असूनही) प्रेमाची माला गळ्यात घालून वनवासालाही तयार झाली. तर प्रेमरूपी जलाची तहानलेली मीरा विषाचा प्याला पिउन गेली. देवा माझ्या सत्वपरीक्षेत मला तारून ने म्हणत.
कारण
क्युं के ये इशक इशक है , इश्क इश्क !
हे प्रेम असंच असतं अगदी असंच !
अल्लाह रसूलका फर्मान इश्क है
यानी हदित इश्क है कुरान इश्क है
गौतम और मसीहाका अरमान इश्क है
य कायनात जिस्म है ये जान इश्क है
इशक सरमद इश्क ही मन्सूर है
इश्क मूसा इशक कोह-ए तूर है
खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क
इन्तहा ये ये के बन्दे को खुदा करता है इश्क
अल्लहची ,पैगंबराची आज्ञा म्हणजे प्रेम. महंमदाची शिकवण म्हणजे प्रेम. कुराण म्हणजे प्रेम.बुद्धाची ,येशूची मनिषा म्हण्जे प्रेम.हे जड विश्व हे शरीर तर त्यातील जीव म्हणजे प्रेम.प्रेम हेच चिरंतन आहे तेच जय देणारे आहे. प्रेम म्हणजे मोझेस अन प्रेम म्हणजेच पवित्र पर्वत. मृत्तिकेला मूर्ति बनवते प्रेम. मूर्तिला देवता बनवते प्रेम. एवढंच काय या प्रेमाची परकोटीची
महती अशी की प्रेमाने भारलेला भक्तच एके दिवशी देवपदाला प्राप्त होतो. कारण
क्युं के ये इशक इशक है , इश्क इश्क !
हे प्रेम असंच असतं अगदी असंच !
प्रतिक्रिया
29 Jul 2014 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच..! इश्काची महती पोहचली.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2014 - 3:17 pm | एस
मस्त उलगडून लिहिलं आहे.
29 Jul 2014 - 3:29 pm | प्रचेतस
क्या बात है काका......!
मस्तच
30 Jul 2014 - 10:04 am | कवितानागेश
मस्त लिहिलय. :)