प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद
___________________________________________________________________
सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.
तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात.
१. मिपावरील प्रतिसादांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील म्हणजे अर्थातच काथ्याकुट आणि जनातलं मनातलं मधील प्रतिसादांच्या टक्केवारीमध्ये फरक फार नसतो.
२. २०११ च्या धाग्यांच्या वेळी पाककृती आणि जो न देखे कवी या विभागांची इतकी वाईट अवस्था झाली नव्हती. पण त्या नंतर २०१२ पासून आजतागायत कोणताही धागा या विषयातून दीड शतक मारण्यास अयशस्वी झालेला आहे.
तस्मात यांचे फ्लोटिंग प्रतिसाद काकू/ ज.म. यांपैकी कोणामध्ये तरी गेले असे म्हणण्यास वाव आहे.
या पार्श्वभूमीवर पाहता पाककृती, जो न देखे कवी यातून दीडशतक झाले असले तरी ती अपवादात्मक घटना म्हणून बाजूला ठेवता येऊ शकते किंवा काही प्रमाणात धागा कर्त्याच्या पोटँशिअल नुसार त्यात शतक मारणे शक्य आहे असे म्हणता येऊ शकते ( येथे मोकल्या या दाही दिशा सारखा कोअर पोटँशिअल कविता धाग्यानंतर मोदकाच्या 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? या धाग्याने दीड शतक मारले आहे). तर नवलेखकांनी दीड शतकाचे टार्गेट ठेवले असल्यास या विभागातून दूर राहिलेले उत्तम. याखेरीस ललित लेख आणि भटकंती या दालनांचा इतिहास दीड शतकाचा नाही तर यातूनही मला नवलेखकांनी दीड शतक मारायची शक्यता शून्य दिसते
आता या दोन मुख्य भागातील विषयवार तक्ता पाहू.
काही विषयवार अंदाज-
मिपा धागा शर्यती मध्ये अपर सर्किट लागून बंद झालेला इंचा इंचाचा धागा “इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?” ( विभाग-का.कू.) हा निर्विवाद विजेता आहे. एक ऑगस्ट २०१० ला सुरुवात झाल्या पासून आजपर्यंत ( शेवटचा प्रतिसाद – २८ फेबु २०१३) हा धागा मिपाचा निर्विवाद जिंकलेला धागा आहे. या विषयावर बाकी फारसे दीड शतकी धागे उपलब्ध नसले तरी ही या धाग्याची नोंद न घेता शतकी धाग्यांबद्दल लिहिणे म्हणजे कटा शिवाय मिसळ खाल्ल्यासारखे आहे.
कॉंग्रेस-भाजपा-आप इत्यादी- २०१२-१३ पासून मिपावरील राजकारण कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात दुरंगी राजकारण होते. आआपने मारलेल्या मुसंडीमुळे हे राजकारण तिरंगी झाले आहे. या मध्ये तीनशे अकरा प्रतीसादांसह विकास यांनी काढलेला आपकी आप की बदमाशियोंके.... हा का.कू. विभागातील धागा प्रथम क्रमांकावर आहे. A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !) हा बाबा पाटील यांचा धागा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कितीही मोदींची लाट असली तरी मिपावर मात्र मोदींना प्रतिसादांच्या शर्यतीमध्ये मोदींची पंतप्रधानपदाची दावेदारी या धाग्याच्या दोनशे एकतीस प्रतीसादांसह तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले आहे. कॉंग्रेस या विषयावर दीड शतकी धागेच नाहीयेत.
क्रीडाविषयक- क्रीडाविभागात निर्विवाद पणे मिपाकर आपले क्रिकेटप्रेम दर्शवतात, क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल या धाग्यावर दोन द्विशतके झालेली आहेत. त्या खालोखाल विश्वनाथन आणि कार्लसन यांच्या बुद्धिबळाचा धागा या विषयात द्वितीय क्रमांकावर विराजमान आहे. या विभागात अस्सल मिपाकाराचे क्रिकेट आणि बुद्धीबळ प्रेम उठून दिसते.
पुणे मुंबई इत्यादी- मिपाच्या बोर्डावर पुणे हा कायम प्रतिसाद मिळवून देणारा हिट्ट आयटम राहिलेला आहे. पुण्यावरचे बरेच धागे पुणेकर आणि नॉन पुणेकर मिपाकरांनानी उचलून धरले आहेत. यातील सगळ्यात जास्त प्रतिसाद असलेला पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे हा डॉ दाढे यांचा धागा. त्या खालोखाल नर्मदेच्या गोट्याने लिहिलेला काय हे पुणेकरांचे कौतुक आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून लिहिलेला मृत्युंजय यांचा पुणेकरांची खाद्य संस्कृती हा धागा मिपा दफ्तरात अजरामर राहिल. या खेरीस चितळे बंधू, आणि असे अनुभव पुण्यातच येऊ शकतात वगैरे काही धागे आहेत. या ठिकाणी मुंबईवर दीड शतक मारलेला फक्त एक सिरीअस धागा आहे.
स्त्री पुरुष समनता-असमानता आणि पुरुषमुक्ती- या विषयाचे मिपावरील फाउंडर आणि मार्गदर्षक श्री आदी जोशी (संस्थापक- उ.न.क.) आहेत. या विषयात बाबा पाटील यांनी आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....
हा अडीच शतकी धागा काढलेला आहे. बाकी या विषयात थोडे फार चिमटे काढणारे बरेच धागे दीड शतकी धाग्यां मध्ये दिसतात. या मध्ये नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? ते IT WIFE आणि स्वयंपाक अशी बरीच वाईड व्हरायटी आपणास येथे पहायला मिळते.
आय टी रिलेटेड- या भागात “गोष्टी आयटीच्या” हा धनाजीरावांचा धागा हैय्येस्ट स्कोरर आहे, त्या खालोखाल दोन स्फोटक विषय एकत्र घेतलेला ते IT WIFE आणि स्वयंपाक हा धागा द्वितीय क्रमांकावर आहे.
या आकडेवारीवरून मिपाकरांना शतकी धागे काढण्यास खचितच मदत होईल अशी अपेक्षा आहे. पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
प्रतिक्रिया
11 May 2014 - 11:51 am | पैसा
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.
11 May 2014 - 11:54 am | प्रचेतस
अगदी, अगदी!
12 May 2014 - 12:00 am | शशिकांत ओक
मित्रा,
असाच विविध प्रकारांनी शोध चालू ठेवावा...
11 May 2014 - 11:58 am | क्लिंटन
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या.
(स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)
11 May 2014 - 12:01 pm | यशोधरा
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
11 May 2014 - 12:02 pm | क्लिंटन
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.
11 May 2014 - 12:22 pm | यशोधरा
नावे व्यनि करु का? ;)
11 May 2014 - 12:24 pm | क्लिंटन
:)
11 May 2014 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !!
मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)
11 May 2014 - 1:16 pm | तुमचा अभिषेक
सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ...
हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :)
यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..
11 May 2014 - 1:24 pm | पैसा
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!
13 May 2014 - 5:26 pm | चिगो
ताई,
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..
13 May 2014 - 5:30 pm | शिद
"शेजार्याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
11 May 2014 - 1:25 pm | प्यारे१
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं.
२००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं ....
तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार????
बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा!
च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)
11 May 2014 - 1:29 pm | पैसा
ते इन्स्टंट हाये! साहेबांनी एवढे भारी विश्लेषण मुंबई पुणे धाग्यावर टाकलं होतं. तिथून त्याला ढकलून इकडे आणण्यात आलंय.
11 May 2014 - 2:44 pm | प्यारे१
अस्संय काय??????
निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत.
गॉड प्रॉमिस! ;)
11 May 2014 - 7:01 pm | लॉरी टांगटूंगकर
धन्यवाद सर्वांना :)
धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर.
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड
11 May 2014 - 10:48 pm | क्लिंटन
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)
11 May 2014 - 11:43 pm | लॉरी टांगटूंगकर
_/\_
11 May 2014 - 3:01 pm | मुक्त विहारि
आवडले....
11 May 2014 - 8:27 pm | भाते
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!
11 May 2014 - 10:45 pm | यसवायजी
मन्द्या, जिवणभौंचे णाव णाही?
णिशेढ.!!!
11 May 2014 - 10:56 pm | विजुभाऊ
जिवणभौ....... तसेच "संपूर्ण कथा मिपावरच " वाले भौ राहिले की .
11 May 2014 - 11:47 pm | लॉरी टांगटूंगकर
भौ आणि येसवायजी.
पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.
12 May 2014 - 7:17 am | बोबो
छान आहे विश्लेषण ...
12 May 2014 - 10:09 am | मदनबाण
बोब्याशी सहमत ! ;)
12 May 2014 - 10:27 am | मृत्युन्जय
हाहाहा. मस्तच निरिक्षण रे मन्द्या. बाकी आमचा धागा मिपा दफ्तरी अजरामर झाल्याचे बघुन डोळे पाणावले ;)
12 May 2014 - 11:25 am | पैसा
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्यांना आणि सुपार्या घेऊन धागे शतकी करणार्यांना क्रेडिट कोण देणार?
सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*
12 May 2014 - 11:27 am | मदनबाण
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा!
टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)
12 May 2014 - 11:28 am | आत्मशून्य
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.
12 May 2014 - 12:42 pm | पैसा
तुमच्या प्रतिसाद द्यायच्या क्षमतेचं कौतुक केलं तर पूस्प्गुच नको म्हणे!
12 May 2014 - 12:53 pm | आत्मशून्य
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.
12 May 2014 - 7:06 pm | आदूबाळ
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात.
(उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)
12 May 2014 - 2:07 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
12 May 2014 - 12:15 pm | कवितानागेश
*dance4*
12 May 2014 - 7:17 pm | आदूबाळ
भन्नाट, मंद्या!
भाग२ साठी सुचवण्या
- आऊटलायर अॅनालिसीस
- धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान
- प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation
:))
12 May 2014 - 7:22 pm | बॅटमॅन
स्ट्याटिस्टिशियन की काय तुम्ही =))
नै म्ह. आमच्या जातीची परिभाषा वापरलीत म्हणून म्हटलें हों ;)
12 May 2014 - 7:29 pm | आदूबाळ
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...
13 May 2014 - 6:27 am | लॉरी टांगटूंगकर
खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय)
प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?
13 May 2014 - 5:42 pm | आदूबाळ
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
तरी (खर्या) नावावरून वयाचा अंदाज बर्यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला.
हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!
13 May 2014 - 5:48 pm | बॅटमॅन
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*