स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती,
लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती
तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते,
दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते
केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो,
मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो
शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला,
पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला
तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो,
आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो
चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली,
आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली
दाट धुक्याला लपेटून, हरवून गेली कुठे,
वेडे फक्त स्वप्नातच येते, भेटायला सांग येशील कुठे
प्रतिक्रिया
15 Jul 2014 - 11:20 am | प्रसाद गोडबोले
लईच =))