नाही विसरलो तुझं
मला ओलांडूनी जाणं,
जाता जाता मनाचं
इतकं कठोर होणं !!
कालपर्यंत दोघांचं
एकच होतं जीणं,
एका वळणावर मात्र
त्या हाताचं झिडकारणं !!
गैरसमज क्षुद्र तरीही
जीवाचं करतो मागणं,
आयुष्यच शून्य होईल गं
तुला करता उणं !!
तेही आठवतात क्षण
तुझं उचंबळून येणं,
आसू हासुच्या आठवांत
गंध वर्षावूनी जाणं !!
ते तुझं चालता चालता बोलणं
बोलता बोलता हसणं,
गालामधल्या खळीमध्ये
माझ्या मनाचं बसणं !!
आता ती खळी नाही
टाकलंस ते बोलणं,
तुझ्या वाचून नाही जगणं
आयुष्याचं तूच तर देणं !!
आठव आणाभाका त्या
ज्यात आपलं होतं जीणं,
प्रवाहाविरुद्ध पोहेन मी
तुझ्यासंगती निर्मीन नवं गाणं !!
:श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी.
ता. पलूस, जि. सांगली (महाराष्ट्र)
प्रतिक्रिया
25 Nov 2014 - 8:05 pm | गणेशा
छान कविता,
आसू हासुच्या आठवांत
गंध वर्षावूनी जाणं !!
मस्त ओळी
25 Nov 2014 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा
नेहमी इतकी प्रभावी नाही वाटली.