"अर्थ"

दिपक विठ्ठल ठुबे's picture
दिपक विठ्ठल ठुबे in जे न देखे रवी...
1 Dec 2014 - 5:51 pm

शब्दांत गुंफले मी
हळुवार जाणिवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||धृ||

मज स्मरणात आज ही रे
ती संध्या भारलेली
संग लाभला तुझा अन
काय माझी मोहरली

जणू चैत्र वणवा विझावा
वळवाच्या सरींनी भिजताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||१||

हे बंध जे जगाचे
पायात घोळणारे
माझी अबोल प्रीती
जणू भिन्न दोन्ही किनारे

दिसतो तुझाच चेहरा
माझे प्रतिबिंब पाहताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||२||

मी जाणते सख्या रे
तव चिंतनी मी आहे
होकार मनी जपते
डोळ्यात लाज आहे

झणी टिपूनी घे ओठांनी
विरहाच्या आसवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||३||

डोळे लागले प्रिया रे
वाटेकडे तुझ्या रे
ये झडकरी घे लवकरी
कवेत मज सख्या रे

तुज पाहण्याची लालसा
मिटनाऱ्या पापण्यांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||४||

मराठी गझलकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

जेपी's picture

1 Dec 2014 - 5:58 pm | जेपी

छान आवडल.

अवांतर-नवीन प्रथेप्रमाणे मिसळपाव वर स्वागत.
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत. :-)

दिपक विठ्ठल ठुबे's picture

1 Dec 2014 - 6:06 pm | दिपक विठ्ठल ठुबे

मिसळपाव वर पहिलाच दिवस माझा.
वाचता वाचता वाटले आपणही लिहुयात.
नवीन मित्र बनवूयात..
शीघ्र प्रतिक्रियेबद्दल आभार..

दिपक विठ्ठल ठुबे's picture

1 Dec 2014 - 6:08 pm | दिपक विठ्ठल ठुबे

राधा या शीर्षकाने पुढील कविता प्रकाशित केली आहे.
प्रतिक्रिया जाणून घेण्यास नक्की आवडेल

स्वप्नज's picture

1 Dec 2014 - 8:41 pm | स्वप्नज

चांगलीय. आवडली.

दिपक विठ्ठल ठुबे's picture

2 Dec 2014 - 12:26 pm | दिपक विठ्ठल ठुबे

धन्यवाद...
आभारी आहे.

पाषाणभेद's picture

2 Dec 2014 - 9:33 am | पाषाणभेद

सुंदर

शब्दानुज's picture

2 Dec 2014 - 5:59 pm | शब्दानुज

शेवटी म्हणालात की वाटेकडे डोळे लागले .....पुन्हा म्हणालात मिटलेल्या पापण्यांनी..... असे कसे...
असो विनोद अलहिदा..
टिपुन घे अोठांनी विरहाच्या आसवांना.....व्वा