नजर

सुर्या गार्डी's picture
सुर्या गार्डी in जे न देखे रवी...
3 Dec 2014 - 11:23 pm

नजरेला नजर बांधून
डोळ्यांनीच नुसतं पाहणं तुझं,
न बोलूनही सांगतं सारं काही।।

जाता जाता मिश्किल हसून
ओठांवर नजर खिळवणं तुझं,
प्रीतीचं रोमांच फुलवतात किती।।

चालता चालता थबकून
मागे वळून पाहणं तुझं,
चोरून चोरून पाहण अन्
गालातल्या गालात हसणं तुझं
ह्रद्याच्या तारा छेडतात किती।।

दूरवर जावूनही नजरेनं
शोधत राहणं तुझं
अन् रोज रात्री स्वप्नात येवून
प्रेम गीतं शिकवणं तुझं
गीताला सुरांची देतात प्रीती।।

तरीही तरीही सांगून टाक् ह्रद्यातलं सारं
कारण तू ही अधांतरी राहून
मलाही अधांतरी ठेवणार किती?

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Dec 2014 - 3:23 pm | मदनबाण

वाह... क्या बात हय ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.

स्वप्नज's picture

5 Dec 2014 - 7:58 pm | स्वप्नज

छान. आवडली.