प्रेमकाव्य

प्रेमात हे असेच घडते....

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
29 Dec 2015 - 9:56 pm

हे मन का अधीर होते
स्पर्शाने मोहून जाते..
कधी पावलात अडखळते
कधी चांदण्यात उलघडते
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।

हे स्वप्न असे की भास असे
तुझी आस लागे मनाला
स्वच्छंद नवा सहवास तुझा
मग वेड लावी जीवाला
असे मन हे माझे भुलते
अन् पाखरू होऊन उडते
स्वप्नात तुझ्या हे वेडे
दूर आभाळाला भिडते....
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।

प्रेम कविताप्रेमकाव्य

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
27 Dec 2015 - 9:49 pm

घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

प्रेम तुझे हे बरसणारे

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जे न देखे रवी...
24 Dec 2015 - 7:53 am

प्रेम तुझे हे बरसणारे

पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही

तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास

तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा

तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास

तुझ्याच आठवणींची मनात रास

असता जवळ तु हरपतसे भान

दुर जाताच हे जीवन माळरान

तुझ्यात रमले आणि विरघळले

जशी विरघळावी दुधात साखर

आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम

कविता माझीकविताप्रेमकाव्य

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 12:00 pm

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!

dive aagarmango curryvidambanअनर्थशास्त्रअभंगअभय-काव्यआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितावाङ्मयशेतीस्वरकाफियाहास्यवीररसअद्भुतरसशांतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनउखाणेम्हणीसुभाषितेविनोदप्रवासभूगोलनोकरीअर्थकारणराजकारण

अघळपघळ

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 12:38 am

अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला

खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा
श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा
वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला
न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला

नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात
तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात
इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला
लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रसन्न सकाळ

जातवेद's picture
जातवेद in जे न देखे रवी...
20 Dec 2015 - 9:42 pm

सकाळ होती वाचत होतो
पेपर, हातामध्ये चहाचा कप
ग्यालरी माझी चार फुटाची
माती भरल्या मडक्यांचे जग

एका मडक्यात होती तुळस
रांगोळीला केलेला आळस
गतलग्नाच्या बांगड्याही तशाच
नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात

दुसर्‍या मधील अबोली तर खास
खेळवीत होती ओल्या दवास
थोडीशी गच्ची बाहेर झुकून
रोखवीत होती अगणित श्वास

हाय एक होते कोरफड तशात
ना रूप सुगंध गणनाही कशात
घेतसे कधिमधी आजारी असता
औषध म्हणून केवळ लावावयास

प्रकाशचित्रणप्रेम कविताशृंगारकविताप्रेमकाव्य

कोवळं वय

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
19 Dec 2015 - 8:39 pm

प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून
नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते..
.
फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात
रंगण्याच कोवळं वय होते ते..
.
पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते..
कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो..
.

प्रेम कविताप्रेमकाव्य

कोवळं वय

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
19 Dec 2015 - 8:39 pm

प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून
नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते..
.
फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात
रंगण्याच कोवळं वय होते ते..
.
पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते..
कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो..
.

प्रेम कविताप्रेमकाव्य

मदहोश (शायरी)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
12 Dec 2015 - 2:38 pm

हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी
मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी
खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि
ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी

ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव
काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव
एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता
दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता

या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे
का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे
हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा
मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा

प्रेम कविताप्रेमकाव्य

तुझ्या माझ्या वाटेवर.....

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
8 Dec 2015 - 12:19 am

तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू
कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू

नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ
तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू

नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई
तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही

तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी
रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी

मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी
माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी

आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान
तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान

कविता माझीप्रेमकाव्य