....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
किती लौकर आज उजाडलं बाई
..किती लौकरच आज उजाडलं बाई..
सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही
किती लौकरच आज उजाडलं बाई...
सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ
झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ..
झोपमोड त्याची मला करवत नाही..
चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र..
अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र..
वाटे सकाळच कधी उगवणार नाही..!
तसा आहे आज छान रविवार सुस्त..
घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त...
लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई..
सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही...
किती लौकरच आज उजाडलं बाई
+ कानडाऊ योगेशु
....विश्वाची उलगड होते.....
केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते..
केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते..
पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते.
मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते.
तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते!
मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते.
मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही
तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.**
असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते...
नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते
एक हलकी फुलकी कविता.
बायको कोण असते...
कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते
कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते
कधी समजून घेणारी मित्र असते
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते
कधी मस्का लावणारी असते
कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते
आणि कधी नको असताना जवळ असते
कधी न सांगता समजून घेते
कधी गैरसमज करून घेते
कधी मुलांची काळजी करते
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते
कधी नवर्याला नावे ठेवते
कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते
तशी तू देवभोळी नाहीस
पण नास्तिक नक्कीच नाहीस..
अन मी कुंपणावरच्या सरड्यासारखा...
सोयीनुसार आस्तिक
सोयीनुसार नास्तिक असा.
कुठल्या टुरिस्ट स्थळी फिरताना
माझे नेहेमीचे द्वंद्व..
देवळे टाळावीत का नको...?
तू मात्र अश्यावेळी..
माहेरी आल्यागत...
अन आईला वा बापाला
भेटायला जाण्यागत उत्सुक...
इथवर आलोच आहोत तर
जाऊन येऊ...
अन एरवी संपूर्ण प्रवास
टी शर्ट-जीन्स अथवा
सलवार सुट अश्या
सुटसुटीत..
पोशाखात करणारी तू..
देवी दर्शनाला जाताना मात्र..
नखशिखांत पारंपारिक
थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा
दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा
शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता
मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे
परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी
..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
दिव्यांना नको तू करु मंद राणी
तुला पाहण्याचा मला छंद राणी
पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले
खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी
मला घे मिठीच्याच कैदेत आणि
नको गे करु तू खुले बंध राणी
तुला मी मला तू असे प्राशवावे..
पुरी रात व्हावी मधू धुंद राणी..
तुला लागला सावळा रंग माझा
तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी
- कानडाऊ योगेशु
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना
अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते
ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला
दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून ,
अर्धातास, निमुट उभा रहात,
आमच्या गप्पा ऐकणार्या
तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते
“आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले
दमुन झोपले आहेत बिचारे.
नाही तर आम्ही दोघेच येतो भाजी घ्यायला ”
त्या वेळी मी पण तिला ठसक्यात सांगते
“हा पण काल रात्री दोन वाजता घरी आला आहे”
त्यावेळी तिच्या कडे बघून न बघितल्यासारखे
करणारा तू मला फार म्हणजे फार आवडतोस
वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे.