एक हलकी फुलकी कविता.
बायको कोण असते...
कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते
कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते
कधी समजून घेणारी मित्र असते
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते
कधी मस्का लावणारी असते
कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते
आणि कधी नको असताना जवळ असते
कधी न सांगता समजून घेते
कधी गैरसमज करून घेते
कधी मुलांची काळजी करते
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते
कधी नवर्याला नावे ठेवते
कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते
कधी फिरायला नेलं कि नखरे करते
कधी हट्टउन हौस पुरवून घेते
कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते
कधी शॉपिंगने बेजार करते
कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते
कधी कोणाची गुपितं सांगते
कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते
कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते
कधी घरी यायची वाट बघत बसते
कधी सरळ सूत तर
कधी संशयाचं भूत असते
कधी नवर्याला लगाम घालू पाहते
कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते
कधी शेळी तर कधी वाघ असते
कधी आंबट तर कधी गोड असते
कधी न म्हणते - आज मी दमले, दोन पेग मारते
कधी न संपणारी घराची उर्जा असते
कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते
बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून 'Best Match' म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते.
©Nitin More
प्रतिक्रिया
16 May 2016 - 6:17 am | चांदणे संदीप
कवितेचा पण कॉपीराईट आहे का??
16 May 2016 - 10:11 am | रातराणी
कधी न म्हणते - आज मी दमले, दोन पेग मारते
याच्याशी असहमत.
16 May 2016 - 5:39 pm | पक्षी
अत्तिशय अप्रतिम....जबराट...एक नंबर...इत्यादी...इत्यादी...
16 May 2016 - 6:06 pm | कानडाऊ योगेशु
हॅहॅहॅ
आम्हीही ह्या विषयावर पूर्वी काही लेखन केले होते त्याची आठव्ण आली.
बायको ही सायको असते.