....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
अशाच एका कमपॉप्युलर हिल स्टेशनच्या
कमविख्यात्/कमकुविख्यात
सुसाईड पॉईंटवर
आपण दोघेच असताना
त्याच्या अगदी टोकावरुन
भणाणत्या वार्यात
खाली वाकुन बघत असताना
मी मस्करीने तुझा केसांचा विळखा
तुला नकळत
नाजुकपणे
सोडवतो..अलगद..
तू चपापतेस...
तुझे केस अगदी चोहोदिशांनी उधाणलेल्या लाटांसारखे उसळी घेतात.
तु वळुन प्रथम व्याकुळ
व मग क्रुध्द नजरेन
माझ्याकडे पाहतेस!
मला समजते
अब
तो
मै
गया.!!!
मग तू पर्समधुन
बगळ्याच्या अणुकुचीदार चोचीसारखे दिसणारे
काळेभोर क्लचर काढतेस व
दुमडलेल्या ओठात पकडुन
दोन्ही हातांनी,
भणाणत्या वार्यात भिरभिरणार्या
तुझ्या केसांना सावरण्यासाठी
मानेला मोहक झटके देत
तू ताब्यात घेत असताना
मला समजते...
धिस इज नॉट द "केस" ऑफ ओन्ली समथिंग बीईंग टोटली वेंट राँग..
यु हॅव अॅक्चुअली स्पॉईल्ड "द केस"
बीकॉज यु हॅव अॅक्चुअली स्पॉईल्ड "हर केस"
यु
आर
अबाऊट
टू
फिनिश..!
सिचुएशन कंट्रोल करण्याच्या हेतुने मी कसाबसा एक पी.जे मारतो..!
तसाही मी तुझ्यावर मरतोच आहे गं पण समजा
मी आता इथुन खाली उडी मारुन आत्महत्या केली,
तर तू काय करशील..?????
एव्हाना तुझे भिरभिरणारे केस तुझ्या ताब्यात आलेले असतात.
तु त्यांना एक दोन नाजुक वेलांट्या देत
पुन्हा मागे घेत..
पुन्हा मानेला मोहक झटके देत..
तुझे ते दुमडलेल्या ओठांत पकडलेले
बगळ्याच्या अणुकुचीदार चोचीसारखे दिसणारे
काळेभोर क्लचर
तिथुन काढत
ह्रदयात एखादी धारदार सुरी खुपसावी तसे
एखाद्या सराईत खुन्याच्या सफाईने
व्यवस्थित केलेल्या केसांत खोचत
काहीही वेळ न दवडता म्हणतेस...!
....
....
दुसरे लग्न...!
.
.
नाऊ आय एम फिनिश्ड टोटली..!!!
इन एनी "केस" यु हॅव टू जंप नाऊ!!!!
"केस" क्लोज्ड!!!
.
.
पुढच्या एकदोन साईट सिईंग मध्ये
तु तुझे टिपिकल मौनअस्त्र काढुन फक्त हम्म.. हम्म.. चेच वार करत असतेस..
रात्री थंडगार आल्हाददायक रूममध्येही
एकाच बेडवर झोपताना
तू दोघांमध्ये उशी ठेवुन
माझ्याकडे पाठ करुन झोपतेस..
मी ही कुस बदलतो..
मग मी बराच वेळ,
जंगलात मचाणावर,
वाघाची वाट पाहत असणार्या शिकार्याप्रमाणे
तुझ्या प्रत्येक हालचालीचा कानोसा घेत असताना
अचानक
मागच्या एखाद्या फांदीवरुन
एखाद्या अजगराने
त्या शिकार्याची मान पकडावी तसा
तुझ्या हाताचा विळखा....मागुन, माझ्या मानेला बसतो...
सावध..तरीही गाफिल असा मी काही किंचाळ्णार इतक्यात
तुझी बोटे त्या अजगराच्या जीभेप्रमाणे माझ्या ओठांवरुन फिरतात..
....श्शश श्श्श...
तुझा आवाज येतो अगदी जवळुन..
मचाणावर वाघच स्वतः आला कि काय असा फिल येतो....
मी डोक्याखाली घेतलेला माझा दुमडलेला हात सोडवत..
दोघांमधे ठेवलेली उशी काढुन माझ्या डोक्याखाली देत..
मला आपल्याकडे वळवत तू म्हणतेस..
"
तू किंचाळणार हे मला माहीतच होते.
घाबरट...
साधी एक उशी ओलांडायचे तुला जमले नाही..
आणि म्हणे.. आत्महत्या केली तर...
"
मला माहीती आहे
तुला जेव्हा मला मी अगदीच फालतु आहे हे दाखवायचे असते ना?
तेव्हा तू हमखास अहो जाहो वरुन अरे तुरे वर येतेस....
बिनधास्त..
माझ्या नुकत्याच भादरलेल्या केसात
बोटे माळत..
गंभीरपणे म्हणतेस..
"
तुम्हाला साधी उशी ओलांडायचे जमले नाही...
पण....
मी ओलांडली..!!!!
"
मेसेज इज क्लिअर..!
तू वरुन परत तुम्ही वर...
पुन्हा फालतु वरुन..
यु आर द मोस्ट इंपोर्टंट वन वर...
फुल्टु फिदा..
पण खरं सांगु..
तु मला जेव्हा फालतु समजतेस ना..!
तेव्हा एकतर तू एकतर्फी प्रेम करणार्या आशिकाला
बिलकुल भाव न देणार्या प्रेयसीप्रमाणे
खूप खूप सुंदर दिसतेस..!!!
आणि दुसरे जेव्हा तू अशी खूप खूप सुंदर दिसतेस ना
तेव्हा....
.
.
.
.
.
.
तू
मला
फार फार
आवडतेस....!
+ कानडाऊ योगेशु
आधीची प्रवासवर्णने
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ३
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास २
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास १
प्रतिक्रिया
21 May 2016 - 8:07 pm | प्रचेतस
आहा....!
जबरी झालंय.
21 May 2016 - 8:24 pm | जव्हेरगंज
जरा जास्तच लांबलीय !
त्यामुळं किक नाय बसली !
दोन-चार कविता एकदमच धाडल्या की काय ;)
21 May 2016 - 8:57 pm | रमेश भिडे
आवडली. २-४ ठोके चुकले काळजाचे.
22 May 2016 - 1:38 am | बाबा योगीराज
अचानक
मागच्या एखाद्या फांदीवरुन
एखाद्या अजगराने
त्या शिकार्याची मान पकडावी तसा
तुझ्या हाताचा विळखा....मागुन, माझ्या मानेला बसतो...
सावध..तरीही गाफिल असा मी काही किंचाळ्णार इतक्यात
तुझी बोटे त्या अजगराच्या जीभेप्रमाणे माझ्या ओठांवरुन फिरतात..
....श्शश श्श्श...
तुझा आवाज येतो अगदी जवळुन..
.
.
.
नको णा यार.
इसको क्या अर्थ है?
.
कुठे तरी ऐकलं होत,
जितकं पर्सनल लिहाल, तितकं ग्लोबल होत जाईल.
.
.
पटलं.
22 May 2016 - 1:45 am | रमेश भिडे
आयडी तरी बदला किंवा प्रतिसाद तरी.
कसले बाबा योगीराज म्हणे?
23 May 2016 - 12:18 pm | बाबा योगिराज
प्रत्यक्षात भेटल्यावर नावाचा किस्सा सांगेन.
तो पर्यंत चालू द्या.
23 May 2016 - 4:14 pm | वपाडाव
The more and more you write personal, It becomes more and more universal.
व.पु. काळे In Partner
22 May 2016 - 5:29 am | चांदणे संदीप
या फांदीवर.... मस्त चाल्लयं तुमच!
स्वारी, या इतक्या चांगल्या कवितेल्या टुकार गाण्याने दाद दिल्याबद्दल! कविता कातिल आहे!
Sandy
22 May 2016 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं चालू आहे, तितकं भिडलं नाही. पण, थोडंफार भीड़लं. लिहित राहा. आपापल्या पुस्तकांची पानं उलटायला आपलं लेखन मदत करते.
सालं मीही तिला विचारणार आहे, एकदाच तू ठरवून घे, मी तुला सोबत हवा आहे की नको.... मला तू आवडतेस, मला तुझ्याशी बोलायला आवडतं म्हणून दर काही दिवसांनी तुझं अबोला शस्राचे वार मी आता सहन करू शकत नाही. तरीही तू मला फार फार आवड़तेस.
"अगं ! तुझसे हर कदम पर समझौता क्यों किया जाय !
शौक जीने का है,
मगर इतना भी नहीं,
कि मर मर कर जिया जाय "
-दिलीप बिरुटे
22 May 2016 - 9:11 am | प्रचेतस
काय सर, तुम्ही पण?
22 May 2016 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा धाग्यावर काही कल्पना नै करायच्या तर कुठे करायच्या ?
-दिलीप बिरुटे
23 May 2016 - 10:54 am | कानडाऊ योगेशु
येस सर.
काही वेळेला निरर्थक वाटले तरी व्यक्त होणे गरजेचे असते!
बाकी प्रतिसाद आवडला हेवेसांनल!
23 May 2016 - 10:54 am | कानडाऊ योगेशु
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
23 May 2016 - 10:55 am | कानडाऊ योगेशु
व फक्त कविता वाचुन गेलेल्यांचेही आभार ! :)
23 May 2016 - 11:32 am | रातराणी
जरा मोठी झालीये एवढंच बाकी तुमची बायको फारच चांगली आहे ओ! ;)
23 May 2016 - 11:37 am | अभ्या..
मस्त
मला क्लचरची लै भीती वाटते, फ्लाय ट्रॅप नायतर मगरीसारखे दिसतात ते.
23 May 2016 - 12:00 pm | पथिक
क्या ब्बात है ! एखादा पेग जावा तशी आत गेली !
23 May 2016 - 2:32 pm | स्पा
टांगा पलटी
एकदम भारी :)