समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2016 - 10:49 am

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

मी स्वत:स विसरून जावे
तू असे मला निरखावे
डोळ्यांनी तन्मयतेने
मग युगल गीत गावे

संकोच मनी, भारल्या क्षणी
ना स्पर्शे उभय चित्तांशी
तू अवघी तुला, मीही मजला
जोडतो समर्पणभावाशी

वेडेपण अन् आंधळेपण
असेल उरात जे काही
निथळूदे सारे सारे उत्कट
न राहो मागे उरले जराही

थिजूदे भौतिकता भवती
वा, उधळूदे जीवन वाटांतून
देऊ झोकून दोघांना दोघे
निळ्या गगनाच्या काठांतून

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कविताभावकविताशांतरससंस्कृतीकलावाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

9 May 2016 - 10:49 am | चांदणे संदीप

As promised to पैजारबुवा!

Sandy

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2016 - 2:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

परत एकदा वाचल्यावर अजुनच आवडली,
छानच लिहिली आहे
पैजारबुवा,

अभ्या..'s picture

9 May 2016 - 10:53 am | अभ्या..

मस्तच रे सँडीबाबा,
जरा ते कोमल स्वरात 'नहावी' असे केले तर चालनार नाही का?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 11:05 am | खालीमुंडी पाताळधुंडी

निवळ्ळ जबरा!!
हे लई मस्त हाय

कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

रातराणी's picture

9 May 2016 - 11:14 am | रातराणी

कविता आवडली!

कानडाऊ योगेशु's picture

9 May 2016 - 11:21 am | कानडाऊ योगेशु

सैराट कविता! खूप आवडली.

प्रचेतस's picture

9 May 2016 - 11:26 am | प्रचेतस

अप्रतिम.