श्रावणसर
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते
घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते
कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते
हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते
तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते
उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते
तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते