गद्य लिहू का पद्य फारच गोंधळ झाला. सध्या आमचं दिल के चैन रातोंकी नींद लुटून शांत झोपलेल्या एका मैनेस हे काव्यपुष्प द्यायचे आहे. तुम्हाला काय वाटतं?
कसं झालंय?
तू आहेस ना...
अगदीच वेडी आहेस
कुठल्या तरी वेगळ्याच जगातली
आजकाल तूच असते सगळीकड
माझ्या मनात माझ्या स्वप्नात
चाहूल पण लागून देत नाहीस
तू आलीस की असं
मोरपीस फिरवल्यासारख वाटतं
असं वाटतं
खूप खूप बोलावं
खूप खूप ऐकावं
मनातलं गुपित सांगून टाकाव
पण तुला पाहिलं की
काही सुचतच नाही
मग मी नुसता हसतो
नुसती ओळख दाखवतो
पण तू आरपार पहाते
जणू तूला सगळच माहिती
अशी आरस्पानी सुंदर आहेस
पण का कोण जाणे
हसतानाही डोळ्यात एक उदासी
कधी वाटतं
तुला घेऊन जावं उंच डोंगरावर
तिथं तुला सांगाव
हे खालचं जग आहे ना जग
त्यातली नाहीयेस तू
तू का अशी वेगळी वाटतेस मला?
इथ या कडयावर वाहणारा वारा
काय सांगतो माहिती?
सगळे इथे रानफुलांना शोधतात
आज कुणीतरी पहिल्यांदा
सोबतच घेऊन आलंय
अशीच मग बोलत बोलत येईल संध्याकाळ
तुझ्या डोळ्यात पाहताना
नाही कळणार मला काळवेळ
हरवून जाऊ दोघेही कुठेतरी
पुन्हा कुणाला न सापडण्यासाठी
त्या वेडाबाईच्या आशेवर
अजून तरलिये माझी नैया
नाही झाली आता भेट तरी
काही हरकत नाही
कधीतरी येशील फिरत
याच डोंगरावर
वाराही येईल मग आपसूक
त्या वार्याने तुला शहारा येईल
किती नाही म्हणल तरी
हा नुसती ओळख देणारा वारा
तुला करेलच बेचैन
बस त्या एका क्षणासाठी
मी पुन्हा पुन्हा वहात राहीन
मग मलाही म्हणाल तुम्ही
तो आहे ना...
तो अगदीच वेडा आहे ओ….
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 4:45 am | यशोधरा
ट्रेकींग करणार तर दोघे. मज्जाच की.
19 Mar 2016 - 5:06 am | भरत्_पलुसकर
तेच सांगून घेऊन चाललोय. खर काम दुसरचं हाय. ^=^
19 Mar 2016 - 11:55 am | रातराणी
छानच!
22 Mar 2016 - 9:45 pm | एक एकटा एकटाच
चांगलीय
22 Mar 2016 - 10:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चांगलीये कविता.
बाकी हल्ली जोडपं डोंगरावर हातात हात घालुन निघालय किंबहुना हातात हात घालुन निघालय असं कुठे वाचनात आलं की ह्या ऐतिहासिक पण वाचनमात्रं झालेल्या वैचारपुसीची आठवण येते.
ऐ...चल न......
हास्यफवारे.
23 Mar 2016 - 12:07 pm | भरत्_पलुसकर
हापिसात काम करायचे वांदे करून टाकले राव. येड्यासार्खा हसटॉय राव.
23 Mar 2016 - 1:54 am | भाऊंचे भाऊ
ते प्रामाणिकपने असेल तर सावध व्हा स्वप्नातली परी कितीही मोहक असली तरी ती निव्वळ आपल्याच मनाची भ्रम निर्मिती असते दुसरं तिसरं कोणी नाही याचे भान जाऊ देऊ नका...
डोंगरावर जाणार असाल तर निव्वळ गप्पात वेळ गमावू नका
23 Mar 2016 - 11:03 am | चिनार
कविता चांगलीये..
पण पलुस्कर साहेब....काय बोलू, कसं बोलू, गद्यात बोलू की पद्यात बोलू हा विचार न करता जे मनात आहे ते आधी बोलून टाका..खूप उशीर होण्याआधी...
पैजेवर सांगतो ,तुमच्या मनात काय आहे ते तिला चांगलच माहितीये..बेस्ट लक !!
23 Mar 2016 - 12:07 pm | भरत्_पलुसकर
आभारी आहे :)
23 Mar 2016 - 11:13 am | चौथा कोनाडा
छान आहे कविता.
दोघं मिळुन ट्रेकिंगला जा, डोंगरावर जा, कड्यावर जा
पण सेल्फी काढताना काळजी घ्या.
काही बातम्या वाचुन मनात गलबलायला होतं.
23 Mar 2016 - 12:10 pm | भरत्_पलुसकर
धन्यवाद. सेल्फी काढायच लक्षात तरी यायला पाहिजे. तरीही सूचना लक्षात ठेवेन. :)