मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठेपणा.....

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त Tue, 05/30/2023 - 19:53
मस्त हो भौ. 'भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला' यातल्या पहिल्याच शब्दावर जरा अडखळलो..ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. . Cole Thomas : The Oxbow (The Connecticut River near Northampton 1836) . LEVITAN . GEORGE INNESS . GEORGE INNESS . GEORGE INNESS . ALBERT BIERSTADT, ESTES PARK, COLORADO, 1867.

कर्नलतपस्वी Wed, 05/31/2023 - 08:18
सुंदर प्रतिसाद. धन्यवाद. बादवे, फोरेन मधेपण भादवा असतो काय? सहज शंका आली म्हणून विचारलं.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/01/2023 - 19:37
आणि त्यावर कहर चित्रे. मजा आली. --मात्र "भादव्याची सांज"- का बरे? "श्रावणाची" पण चालले असते. (भादव्याचा संबंध जरा "वेगळ्या" विषयाशी जुळतो म्हणुन--बाकी काही नाही)

भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला मोठेपणा नदीचा पाहूनी जीव माझा भारावला.

निळाई ...

विशाल कुलकर्णी ·

पैसा गुरुवार, 03/30/2017 - 16:26
कसली सुंदर लिहिली आहेस कविता!! "नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा" आठवला एकदम!!

In reply to by पैसा

माफी द्येवा माय एकवार ... समद्यांस्नी थ्यांकू ! निसत्ये प्रतिसाद दिलेल्यांचच न्हाय तर ज्येनी ज्येनी वाचलं त्या समद्यांचं दिकून थ्यांकू =))

मोदक गुरुवार, 03/30/2017 - 16:44
नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणी या सोबत एक समुद्रकिनार्‍याचा एक निळा फोटो दे. बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .

In reply to by मोदक

विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 23:20
हा चालेल का? संपादक मंडळी, आपल्यापैकी कुणी हा फोटो वरच्या मुळ पोस्टमध्ये जोडून द्याल काय? niLaaee

In reply to by अत्रे

ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट केलेत काही प्रमाणात. बाकी कुठलाही इफेक्ट नाही वापरलेला.

उपेक्षित Mon, 04/03/2017 - 13:06
मस्त कविता विशाल भाऊ... पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का ) बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?

लेखनविषय:
काव्यरस

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

निशांत_खाडे ·

पैसा Wed, 02/24/2016 - 21:31
११वीत लिहिलेली? शब्दांची निवड बघून वाटतंय खरं. शिवाय वृत्तात लिहावे का मुक्तछंदात यातही गोंधळ झालेला दिसतोय.

विजय पुरोहित Wed, 02/24/2016 - 21:39
सुंदर रे भावा... तुझा अगोदरचा पण लेख वाचलाय... अतिशय हुंदर भावविश्व आहे तुझं... माझ्यासारखंच आहे ते... मी पण पाऊस, कृष्णमेघ, गावचा पार, भुरभुर पाऊस पाहिला आहे गावचा... I just love it....

मला कवितेच्या बाबतीत कडव्या कडव्यात जे ट्यूनिंग बदलत जाते आणि तो आशयही जेव्हा अधिक आशयघन होत जातो ते मला खुप आवडतं. राग येऊ द्या हवं तर. आपण बोलायला घाबरत नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 23:35
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब, आपण एक चांगले समीक्षक आहात.. आपणाला माहित आहे? काय मोजक्या शब्दात समीक्षण करता राव प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब तुम्ही! बायदवे, पाऊस, मानवी मन, आणि भावना यांच्यात काहीच संबंध नसतो असे आपण समजता म्हणून मी आपला हा 'आशयाविशयीचा' प्रतिसाद तेवढासा सिरीयसली घेत नाहीये!

विजय पुरोहित Wed, 02/24/2016 - 22:50
लिहित रहा नि.खा... कुणाला राग येऊचा तर येऊ दे... सुंदर अप्रतिम लिहीता... हे भावविश्व फार दुर्मिळ आहे... गावची आठवण देणारे भावविश्व... लिहित रहा....

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की स्मृतीतला गाव दिसू लागतो त्या गाव वेशी उभा मीच मजला पाहून अनोळखी हसू लागतो दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या सावलीत जरासा बसू पाहतो स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो. पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा बदलाच्या भ्रांती फसू लागतो लोभस ते जग कधीचे संपले खरा भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो.. (कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही.

प्रसन्न सकाळ

जातवेद ·
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

शिव कन्या ·

मोगा Fri, 12/11/2015 - 22:32
शाळेच्या पुस्तकात पद्मा गोळे नामक कवयित्रिची कविता होती. ती आठवली. छान आहे.

कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 02:44
नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ गुरुवार, 10/16/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:58
खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 11:40
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा गुरुवार, 10/16/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी गुरुवार, 10/16/2014 - 23:16
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

अनुप ढेरे गुरुवार, 10/16/2014 - 09:34
हे ही आठवले. http://www.misalpav.com/node/2935 सर्किट, घाटावरचे भट आणि मुक्तसुनीत यांचे प्रतिसाद वाचनीय आहेत.

In reply to by असंका

बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

हिमालय की गोद मे

गंगाधर मुटे ·

सुंदर फोटो ! कांचनगगाचे फोटो पाहून जुन्यास्मृतींना उजाळा मिळाला ! तो पहाटेचा बदलत्या रंगांचा नजारा अवर्णनिय असतो ! फक्त एक छोटीशी सुधारणा. कांचनजंगा जगातले तीन (K3) क्रमांकाचे शिखर आहे. दोन क्रमांकाचे केतू / केचू (Chhogori/Qogir, Ketu/Kechu, and Mount Godwin-Austen) शिखर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बाल्टीस्थान आणि ताजिकीस्तानच्या सीमेवर आहे.

गंगाधर मुटे Sun, 04/26/2015 - 19:44
नेपाळ मधील भुकंपाच्या बातमीने मन अस्वस्थ झाले. आणि जुन्या आठवणीं पुन्हा मनात रेंगाळल्या. :(

Taxonomy upgrade extras

*  H  *  A  *  P  *  P  *  Y  *   *  H  *  O  *  L  *  I *

"face Black" न झालेल्या सर्व "facebook" मित्रांना/मैत्रीनींना 

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

गंगाधर मुटे ·

मनिम्याऊ Fri, 08/16/2013 - 23:21
छान आहे प्रवास वर्णन.... मागल्याच वर्षी नागद्वार यात्रेला जाण्याचा योग आला. तुमचे प्रवासवर्णन वाचून पुन:प्रत्यायचा आनंद मिळला. मागील वर्षीच्या यात्रेचे काही फोटो.... . . . . . .

सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रे. इतके प्रवासी येत असतानाही काहीच व्यवस्था आणि विषेश म्हणजे सुरक्षाव्यवस्थाही न करणार्‍या प्रशासनाबद्दल काय म्हणावे ?

तिरकीट Sat, 08/17/2013 - 12:21
सुंदर वर्णन आणी तितकीच सुंदर चित्रे, फक्त, पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही याला अपवाद म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावले इथला....

In reply to by तिरकीट

कपिलमुनी Mon, 08/19/2013 - 12:57
साधा वरण भात असतो ..दुपारी गेलात की .. जेवढे भाविक आहेत त्यांना बोलावतात... अशी अजुन बरीच ठिकाणे आहेत छोटी छोटी

In reply to by तिरकीट

अनिरुद्ध प Mon, 08/19/2013 - 19:02
बरिच स्थाने आहेत्,महाराष्ट्रात्,जीथे दररोज मोफत अन्नदान होते,उदा,शेगाव्,गणपतिपुळे,परशुराम्,नरसोबाची वाडी,सज्जनगड,ईत्यादी.

गंगाधर मुटे Sat, 08/17/2013 - 13:57
@ मनिम्याऊ - धन्यवाद @ इस्पीकचा एक्का - प्रशासनाच्या भुमिकेबद्दल मूळ लेखात नव्याने माहिती घातली आहे. @ विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

विलासराव Mon, 08/19/2013 - 13:09
विलासराव - चला ना! जाऊ डिसेंबरमध्ये. मात्र तेव्हा नागद्वार पाहता येणार नाही. बाकी सर्वच पाहता येईल. चालेल. या निमित्ताने तिथे आंतरजालिय मित्रमंडळींचा मेळावा देखिल आयोजित करायला हरकत नाही. smiley मग तर जाउच.

In reply to by स्पंदना

गंगाधर मुटे Mon, 08/19/2013 - 12:40
नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी-व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाही. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकून ट्रेन्ड बनलेला आहे. म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता. शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत. १) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे. २) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही. ३) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

चिगो Mon, 08/19/2013 - 17:51
लहानपणी गावात ऐकलेली "महादेवा जातो गा", "नागद्वारा जातो गा" वगैरे गाणी म्हणत प्रचंड रडारड असलेली निरोपयात्रा आठवली. एकंदरीतच अतीकठीण यात्रा असल्याने यात्रेला जाणार्‍या यात्रेकरुला "शेवटचाच निरोप" देत असल्यासारखे वातावरण असायचे.. विदर्भात ग्रामिण भागात ही यात्रा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे..

गंगाधर मुटे Tue, 08/20/2013 - 15:05
@उगीच काहीतरी, @कपिलमुनी, @अनिरुद्ध प @कानडाऊ योगेशु धन्यवाद भंडारा आणि अन्नछत्राच्या बाबतीत नागद्वार विरुद्ध अन्य तिर्थस्थळे असे द्वंद मला निर्माण करायचे नव्हते किंवा नागद्वार हेच याबाबतीत सर्वश्रेष्ट आहे, असाही उद्देश माझ्या लिखानाचा नाही. गोंदावले आणि सजनगड वगळता शेगाव, गणपतिपुळे, परशुराम, नरसोबाची वाडी ही स्थळे मी पाहिली आहेत. पण ही स्थळे संस्थाने/देवस्थान या स्वरुपाची आहेत. शिवाय ही अन्नछत्रे संस्थान तर्फे चालविली जातात. मात्र ज्याला तिर्थयात्रा मानली गेली अशी स्थळे उदा. पंढरपूर, काशी, प्रयाग, रामेश्वर, द्वारका, हृशिकेश, हरिद्वार, जगन्नाथपुरी वगैरे ठिकाणी अशी व्यवस्था नाहीय. काही पर्वतीय स्थळे जेथे रस्त्याने चालताना भोजनाची नितांत गरज असते उदा- जम्मूमधील वैष्णोदेवी, मध्यप्रदेशातील मैहर, उत्तरांचलातील मनसादेवी, झारखंडातील बम्लेश्वरी, गुजरातेतील बेटद्वारका किंवा हरसिद्धीमाता वगैरे ठिकाणी मात्र अशी व्यवस्था नाहिये.

गंगाधर मुटे Wed, 08/21/2013 - 22:12
एक जिज्ञासा प्रवासाला निघण्याआधी दोन दिवसापूर्वी म्हणजे ६ तारखेला माझी Blood Sugar 170 mg/dl होती. प्रवास आटोपून आल्यानंतर सात दिवसांनी आज तपासली असता 130 mg/dl आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच श्यूगर एवढ्या नॉर्मल पातळीवर आली आहे. हा एकंदरीत काय प्रकार समजावा, शास्त्रीय किंवा अनुभवावरून किंवा अंदाजावरून काही निष्कर्ष काढता येऊ शकतील काय?

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव Wed, 08/21/2013 - 22:31
एव्हढे शारीरीक कष्ट, निसर्गाचे सान्निध्य, अत्यंत समाधान देणारा प्रवास, सेन्स ऑफ अचिव्हमेण्ट, नेहमीच्या खाद्यसवयींपेक्षा वेगळं जेवण... असे अनेक फॅक्टर असु शकतील. अर्धवटराव

पैसा Sat, 08/24/2013 - 14:33
एका अनोख्या ठिकाणाची तेवढीच सुंदर ओळख! फोटो फार छान आले आहेत. तिथे जाणे कष्टसाध्य आहे आणि तथाकथित टुरिस्टांची वक्र दृष्टी वळली नाही हे नशीबच म्हणा. हल्लीच रेल्वेने येत असताना दूधसागर धबधब्याच्या मागे पुढे सुमारे १० किमि पट्ट्यात रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि जंगल भर टुरिस्टांचे आरडाओरडा करणारे लोंढे पाहिले. आधीच्या स्टेशनमधे रिझर्व्हेशनच्या डब्यात चढून दमदाटी करून झोपलेल्या प्रवाशांना उठवले गेले. पूर्णा एक्सप्रेसची साखळी खेचून रेल्वे थांबवणे रोजचे झाल्यामुळे मोटरमन कंटाळून धबधब्याजवळ रेल्वे थांबवतात आणि या रेडयाना उतरू देतात असे सोबत असलेल्या एका रेल्वेतील कर्मचारी महिलेने सांगितले. तेव्हापासून टुरिस्ट म्हटले की संताप होतो. नागद्वारला असा उपद्रव नसेल तर चांगलेच आहे!