मोठेपणा.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
30 May 2023 - 12:32 pm

भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला

जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला

काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला

डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला

नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला

श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला

चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला

पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला

मोठेपणा नदीचा पाहूनी जीव माझा भारावला.

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीप्रकाशचित्रणमुक्तकछायाचित्रण

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

30 May 2023 - 7:53 pm | चित्रगुप्त

मस्त हो भौ. 'भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला' यातल्या पहिल्याच शब्दावर जरा अडखळलो..ह्यॅ ह्यॅ ह्यॅ..

.
Cole Thomas : The Oxbow (The Connecticut River near Northampton 1836)

.
LEVITAN

.
GEORGE INNESS

.
GEORGE INNESS

.
GEORGE INNESS

.
ALBERT BIERSTADT, ESTES PARK, COLORADO, 1867.

प्राची अश्विनी's picture

14 Jun 2023 - 9:50 am | प्राची अश्विनी

आहा!

कर्नलतपस्वी's picture

31 May 2023 - 8:18 am | कर्नलतपस्वी

सुंदर प्रतिसाद. धन्यवाद.

बादवे, फोरेन मधेपण भादवा असतो काय? सहज शंका आली म्हणून विचारलं.

चित्रगुप्त's picture

31 May 2023 - 5:34 pm | चित्रगुप्त

हल्ली सगळंच ऑनलाईन झाल्यामुळे गरज पडत नसावी, असे 'ह्यांचे' म्हणणे.
- ताईसाहेब भादवासुंगीकर.

कुमार१'s picture

31 May 2023 - 7:44 pm | कुमार१

आवडलीच ..

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2023 - 7:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि त्यावर कहर चित्रे. मजा आली.

--मात्र "भादव्याची सांज"- का बरे? "श्रावणाची" पण चालले असते. (भादव्याचा संबंध जरा "वेगळ्या" विषयाशी जुळतो म्हणुन--बाकी काही नाही)

प्राची अश्विनी's picture

14 Jun 2023 - 9:50 am | प्राची अश्विनी

वाह!