या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या
छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या
तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले
तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले
तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
प्रतिक्रिया
18 Nov 2015 - 9:26 pm | मांत्रिक
क्लासच माहीराज!!!
आवडली कविता...
18 Nov 2015 - 9:59 pm | एक एकटा एकटाच
जाम भारी
19 Nov 2015 - 11:02 am | चांदणे संदीप
जबरदस्त! खूपच आवडल्या ह्या ओळी!
कुठे होतात मालक इतके दिवस? ___/\___
Sandy
20 Nov 2015 - 5:38 am | माहीराज
धन्यवाद ...
22 Nov 2015 - 10:06 am | रातराणी
आवडली!
22 Nov 2015 - 4:20 pm | पैसा
छान!
मात्र हल्ली खूपजण "त्र" हा "ञ" असा का लिहितात काही कळत नाही.
23 Nov 2015 - 12:05 am | माहीराज
मागील सल्ला लक्षात घेऊन या कवितेत "त्र" चा सन्मान केला आहे .
23 Nov 2015 - 12:08 am | माहीराज
पण (ञ)ही एक typing mistek आहे. मुळात ते (त्र) असे असायला हवे. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
23 Nov 2015 - 4:35 pm | पैसा
मोबाईलवर जे स्वरचक्र कीबोर्ड वापरतात, त्यानी "त्र" टाईप केला तरी "ञ" असंच उमटतं. मी तो कीबोर्ड वापरला नाही त्यामुळे सांगू शकत नाही.
22 Nov 2015 - 6:08 pm | अत्रुप्त आत्मा
अप्रतीम!!!
23 Nov 2015 - 12:16 am | बॅटमॅन
अरेवा!!!!
24 Nov 2015 - 7:24 pm | पुनवेचा चन्द्र
अप्रतिम... आवडली!!!