हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुसर्यांदा जिंकली.
२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.
आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter."
म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?