संस्कृती

अशी स्मिता होणे नाही...

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 3:51 pm

लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली.

संस्कृतीकलासमाजचित्रपटआस्वादलेखप्रतिभा

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 10:49 am

आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-शिवकन्या

अनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकालगंगामुक्त कवितासांत्वनामांडणीवावरसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरराहती जागा

शिवरायांचा कालचा दसरा

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 9:19 am

भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा अस्ताला चालला होता. गंगासागराशी सातमजली मनोर्‍यांसोबत त्याचे सुंदर प्रतिबिंब पडलेले. शरदाच्या चांदण्यात गडावर विविधरंगी रानफुलांचा रानसोहळा चालू होता. त्यात सोनकीने ठिकठिकाणी सुवर्णझळाळी आणली होती. भुईरिंगणी, चिरायतीची पखरण गडाच्या सपाटीवर रंग भरत होती.

संस्कृतीइतिहासकथाप्रकटन

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Oct 2016 - 8:50 am

"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली.

२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.

आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter."

म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?

संस्कृतीलेख

जप

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
11 Oct 2016 - 5:15 am

इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो.
ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये.
या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही.

संस्कृतीधर्मसमाजतंत्रशिक्षणप्रकटनविचारसद्भावनामाहिती

!! रावणामुळे दिवाळी !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Oct 2016 - 5:36 pm

!! रवानामुळे दिवाळी !!

स्वामी व्हावे तिन्ही जगाचे मनाशी निर्धार केले,
कठोर तपस्या ध्यान लाउनी भ्रमविद्या सध्य केले,
शंकराने दास व्हावे ऐसा तो शिवभक्त झाला,
देव, ऋषी गण हेवा करिती ऐसा महाविद्वान झाला !!१!!

पण विद्वतेचा महामेरू क्षणामध्ये चूर झाला,
पाहुनी साध्वी सीतेला, तव मनाचा तोल गेला,
अपहरुनी पर सौभाग्येला, रावणाने अनर्थ केला,
अहंकाराच्या तिमिरातून, दानवाचा जन्म झाला !!२!!

कविता माझीसंस्कृती

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 5:33 pm

शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)
'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,
तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.

या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार
लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.
आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)

संस्कृतीबालकथाराहणीऔषधोपचारराहती जागागुंतवणूकफलज्योतिषराजकारणमौजमजाविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादमाध्यमवेधअनुभवचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभाविरंगुळा

एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 10:04 am

चाकोरीबाहेर जाऊन चाकोरी न सोडण्याचं तंत्र आज्जीला खासच जमलं होतं .
आज्जी तेव्हा विठ्ठल सायन्नाला म्हणजे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलला दाई होती.
चौथी पास झालेल्या बायांना तेव्हा मिड वायफरीला प्रवेश मिळायचा.
ठाण्यात तेव्हा अडलेली बाळंतीण सोडवण्यासाठी गरीबांसाठी असं हे एकच हॉस्पीटल होतं.
तेव्हा मालती बाई चिटणीसांच पण हॉस्पीटल नसावं. वैद्य किंवा देवधर तेव्हा नव्हतेच.
सांगायचं ते काय की आज्जी दिवसभर बाळंतपणं करण्यात गुंतलेली.
ननूमामा म्हणजे आज्जीच्या सवतीचा मुलगा.त्याला त्याच्या मामानी हट्ट करून नंदुरबारलाच ठेवून घेतला होता.

संस्कृतीप्रकटन

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 7:55 am

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

अविश्वसनीयकविता माझीकालगंगाभावकवितामुक्त कविताविराणीवीररसधोरणमांडणीवावरसंस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजराजकारण