महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण
कालच मराठ्यांची राजधानी रायगडावर एक अनुचित प्रकार घडल्याची बातमी येऊन थडकली. शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी चक्क राजदरबारात सिंहासनाच्या जागेवर स्थापित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर असलेली तलवार उध्वस्त केली. काहींच्या मते हा चोरीचा गुन्हा असून काहींच्या मते चोरीच्या प्रयत्नात केलेली मोडतोड होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला आहे. पण हा निव्वळ चोरीचा प्रयत्न नसून एका राष्ट्रीय पुरुषाच्या प्रतिमेची विटंबना आहे. कारण काहीही असो, निव्वळ आक्रोश आणि त्रागा व्यक्त करण्यापलीकडे जाऊन याची कारणमीमांसा आपण शोधून, हे प्रकार घडण्याचे मूळ असलेली वृत्तीच नष्ट केली पाहिजे.