एका वर्सात

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 7:16 am

एका वर्षाच्या बाद अकोल्यात येऊन रायलो परवाच्या दिवशी,
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

अजून बी पिकवित लोक सकाळी फिराले जात असतीन काय?
दिवसभर मंग धूळ्ला खायाले तयार होत असतीन काय?
च्या प्याले कप देतात, का अजूनही वापरतात बशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

अजून बी दुपारच्या जेवनाले मंग वांग्यावर तर्री असते काय?
गरमागरम वरणभातावर तुपाची धार खरी असते काय?
इंजेक्शनवालं दुध देत नाहीत ना आपल्या म्हशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

अजून बी सांजच्या पाराले लेकरं शुभंकरोती म्हणतात काय?
गांदीरोळच्या त्या पानिपुरीलेच चौपाटी म्हणतात काय?
पिझ्झा बर्गर साठी भेळपुरीची सोडली नाई न बशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

तुमी म्हणन भाऊ एका वर्सात एवळं बदलत असते काय?
कपडे बदलले म्हणून माणूस बदलते काय?
बदलले नसान अशीच आशा घीयून येऊन रायलो आपल्या देशी
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?
- संदीप डांगे

कविता माझीसंस्कृती

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

27 Oct 2016 - 9:55 am | महासंग्राम

अकोल्यात आयुक्त सोडून बाकी घंटा काय बदल होत नसते राजेहो ...

तेच रस्ते, तेच धुय
१२० खर्र्याच अजून हाय खुय

बोल अ.कु. काका कि जय