एक किस्सा
एक किस्सा
असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे.
अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते.
एक किस्सा
असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे.
अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते.
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.
अलक १
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि...
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.
अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.
तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.
पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं...
ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...
बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.
या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...
नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती.
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो.
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!