मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Tensors: बलांच्या युतीचा(Confluence of Forces) ऊर्जा परिणाम (Scalar or Dot product) आणि बल परिणाम (Vector or Cross Product)

अनिकेत कवठेकर ·

तंत्रजगतचं दलन बंद असलं तरी आपण आपलं लिहितं राहावे. लेख उदाहरणाच्या माध्यमातून चांगला समजावला आहे. धन्स. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही दिवस मला वाटलं की माझ्या अकाउंट शी सम्बन्धित प्रॉब्लेम असावा. मग शेवटी इकडे लेख टाकला. पुढचे लेख नक्कीच इथे टाकत जाईन. आभारी आहे तुम्ही दिलेल्या अनुमोदनासाठी आणि प्रोत्साहनासाठी

In reply to by कंजूस

तुमचं म्हणणं खरं आहे. डॉट आणि क्रॉस प्रॉडक्ट बद्दल लिहिणं अवघड आहे. विचार करत करतच २-३ महिने लागले. पण जशी जशी उदहरणे सुचत गेली, दिसत गेली आणि मी लिहित गेलो तसे थोडे मलाच अधिक समजले. स्पॅनरचं आणि टायर जॅकचं सुचलं त्या दिवशी काम थोडं विज्युअल झालं आणि सोपं झालं

लेखनविषय:
लेखनप्रकार
(तंत्रजगत दालन बहुतेक मिपावाल्यांनी बंद केले आहे..म्हणून इथे लेख..) विक्रमाच्या राज्यात एक अनोखीच म्हणावी  अशी बैलांच्या शक्तीची स्पर्धा घेण्यात आली होती. पण हि स्पर्धा साधी सुधी नव्हती. हि कुठल्याही मैदानात दोन मदोन्मत्त बैलांना झुंजवून किंवा त्यांना जोरजोरात पळवून रेस लावून अशी खेळली गेलेली नव्हती. कोणते बैल त्यांच्या मालकाच्या विहिरीतून सर्वात लवकर पाणी काढून शेताला पुरवतील अशी हि स्पर्धा होती. यात बैलांपेक्षा बैलांच्या मालकाची परीक्षा होती. कोणता मालक बैलाला कमीतकमी श्रम देऊन जास्तीत जास्त पाणी बाहेर काढतो हे विक्रमाला पाहायचे होते.

शशक | तीर

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

चित्रगुप्त 11/03/2023 - 08:34
शशक आवडली. दोनदा वाचल्यावर शेवटल्या वाक्यातून, ही कथा कुणाबद्दल आहे याचा खुलासा झाला. जंगलात उपाशी 'घुमत' होता म्हणजे फिरत, भटकत होता असे म्हणायचे आहे का? की अंगात आलेल्या बायका 'घुमतात' तसे? तसेच 'जारपारधी' शब्द समजला नाही. तशी काही विशिष्ट जमात होती का? 'जार' शब्दाचा विशिष्ट अर्थ इथे अभिप्रेत नसावा असे वाटते. समुद्राकाठी घडलेल्या 'यादवी' तून घडून आलेला यादवांचा वंशच्छेद, अर्जुनाचा अभीरांनी केलेला पराभव वगैरे घटना असलेली माझी 'सुभद्रा : महाभारताची हेलन आफ ट्रॉय' ही लेखमाला आठवली. बाकी उत्तम जमली आहे कथा.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 11/03/2023 - 09:06
जारपारधी- त्या पारध्याचे नाव जरा. अर्थात जरा म्हणजे वृद्धत्वाने आलेल्या विकलतेचे प्रतिक आहे.

महाभारतात कृष्ण,अर्जुन यांना योग विद्येने कुठेही बसून काहीही बघता यायचे. पुढे ती विद्या अश्वत्थाम्याला व्यासांनी कलियुगात शिकवली असे वाचले आहे. तुम्हाला पण येत असावी असे वाटले. छान लिहिलयं

चित्रगुप्त 11/03/2023 - 15:36
माझ्या मते यातील संदर्भ सगळ्यांना माहीत असतात पण ते अगदी वेगळ्या भूमिकेतून मांडलेले असल्याने इथे एकदम लक्षात येत नाहीत. देवत्व पावलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे काही लिहीलेले अनेकांना रुचतही नाही.

भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या!

जिरेटोप

जे.पी.मॉर्गन ·

कुठल्याहि जयंत्या,डिजे,डोल्बी,आयटम साँग शिवाय साजऱ्या होतच नाहीत. रयत ध्वनी प्रदूषणाने बेजार आहे. विद्यार्थी अभ्यासवर एकाग्रचित्त होऊ शकत नाही. आगोदरच झोप कमी असलेले वयोवृद्ध रात्रभर जागे आहेत. कोर्टाच्या नियमांना वेशीवर टांगलय,अक्षरशः पायमल्ली व पोलीस यंत्रणा तर XXX पेक्षाही जास्त हतबल झालीय. कितीही वेळा काॅल करा उचलत नाही. तक्रार नोंदवून घेतली तरी काहीच कारवाई करत नाही.राजकारणी वन अपमॅनशिप दाखवण्या करता तरूणाई ला पैसा पुरवतात. संतरजी उचल्यांना एक चपटी,चकणा व पेट्रोल दिले की कुत्र्याच्या XXला पेट्रोल लागल्या सारखे मोटर सायकलीचा सायलेन्सर काढून रात्र रात्र वस्तीत घिरट्या घालतात. आवाज एवढा मोठा आवाज की दारे,खिडक्या आपटतात. तो जाणता राजा रयतेवर जुलूम झाला म्हणून पाटलाचा *चौरंग्या* करणारा आज स्वर्गात दुःखी असेल. प्रत्येक शिवजयंतीला "मी शिवाजीराजे बोलतोय "या सिनेमा सारखे जर महाराज खरेच आले तर काय करतील याची कल्पना करत बसतो. अशाच एका लग्न समारंभात लावलेला डिजे मुळे त्रासलेल्या वरिष्ठ नागरिकाने दहा लाखाची डि जे सिस्टीम तोडली. त्यावर भा पि को अनुसार खटला भरला आहे. शिवजयंती झाली की अंबेडकर मग गणेशोत्सव मग लग्नसमारंभ. आमच्या गावात तर बैलपोळ्याला सुद्धा डि जे लावतात व तीन तास वाहतूक कोंडी नक्कीच होते. बाकी तुम्ही चांगले लिहीले आहे.

सौंदाळा 12/03/2023 - 20:37
मस्त लिहीलं आहे वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे. जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे. रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.

लेख आवडलाच. पण शिवाजी महाराज आता फक्त मनात राहिलेत. प्रत्येकाने आपापल्या राजकिय फायद्यासाठी त्यांना वेठीला धरलेय. वर्षातुन ३ वेळा शिवजयंती साजरी होतेय. एकदा "ह्यांची" एकदा "त्यांची". जनता मोठ्मोठे डि जे/ रस्ते अडवणारी स्टेज, ट्रॅफिक जॅम, वर्गणीच्या नावाखाली खंडणी, हप्तेबाजी याने त्रासली आहे. "या या अनन्य शरणा आर्या ताराया" म्हणायची वेळ आली आहे.

"सर... ओळखलंत का मला?" आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्‍यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो. पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अ‍ॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा.

शशक- निवडणूक ३

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 03/03/2023 - 14:26
अगदी वास्तवाच्या जवळ जाणारी. मते किंवा पैशाचा पाठिंबा घेऊन मिंधेपणा पत्करला की पुढे ५ वर्षे त्यांच्याच तालावर नाचायचं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.

आधीचे भाग निवडणूक निवडणूक २ साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात? अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार? पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा. अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात.

शशक- खड्डे

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का? डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे. नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली. डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे. नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत? डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल. नर्स- बापरे.

मोगरा फुलला (ऐसी अक्षरे ..मेळवीन -८)

Bhakti ·

गो नी दांडेकर यांचे तुका आकाशा एवढा हे पुस्तक सुद्धा खुप सशक्त आहे. तुकाराम वाणी ते तुकाराम महाराज हा सर्व प्रवास अत्यंत साध्या सोप्या शब्दात जगनाडे महाराजांच्या तोडून वदवून घेतला आहे. लेख आवडला. पुस्तक शोधून नक्कीच वाचेन.

प्रचेतस 28/02/2023 - 08:50
गोनीदांच्या रसाळ शैलीत असणारी हीमोगरा फुलला, तुका आकाशाएव्हढा आणि आनंदवनभुवनी ही तिन्ही पुस्तके वाचणे म्हणजे एक प्रत्ययकारी अनुभवच आहे. छान लिहित आहात.

m एका निळाशार डोहात बुडून जावं,तळाशी माउलीची भेट घ्यावी.शिंपला हाती घेत काठाशी यावं.त्यात चमचमता निळा मोती असावा.तो मोती मोगराच्या फुलांच्या राशीत अलगद ठेवावा.असा भास मुखपृष्ठ पाहील्यापासुनच होतो. लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) ह्यांचे ज्ञानेश्वर चिंतनाचे फलित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक १९७५ साली प्रथम प्रकाशित झाले. ज्ञानेश्वरकालीन काळाचा मागोवा ,कावेरी (रुक्मिणीची सखी),भट्टदेव (साऱ्या कुटुंबाचे हितचिंतक)या काल्पनिक पात्रांचे स्वगत माध्यमातून कोमल,संवेदनशील ,काव्यशब्द लयीनी यात साकारले आह

शशक- निवडणूक २

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचा भाग शशक- निवडणूक आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो. कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल. आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी? कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो. आबा - काय भाव आहे यावेळी? कार्यकर्ता- ५०० रुपये. आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो.

वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

वरील चित्रपटाविषयीची सध्याची स्थिती या व्हिडिओने लक्षात येईल. चटर्जींची मुले त्यांना परत मिळाली आहेत असे दिसते.

कंजूस 25/02/2023 - 05:59
तेल मालीश न करताही मूल वाढू शकतं का हे पाहणे गरजेचे आहे.

टाळू भरणे, धुरी देणे, डोळ्यांत अंजन घालणे, बाळाच्या कानात तेल ओतने, तीट लावणे, मुलाला उलटं पालटं करून आंघोळ घालणे असे अवैज्ञानिक प्रकार असला तरी, आपल्याकडे लहान लेकराला जे स्नान घातलं जातं म्हणजे, आजी दोन्ही पाय पसरवून त्यावर बाळाला पालथं घालून त्याला जे न्हाऊ-माखु घातलं जातं ते परंपरेने आलं आहे, आपल्यापैकी बरेच असेच न्हाऊ-माखू घालूनच लहानाचे मोठे झाले आहेत. कंजूस काका म्हणतात त्या प्रमाणे जो पर्यंत त्याचे फायदे तोटे पुढे येत नाही, त्याबाबत जागृती होत नाही आणि तसे काही कायदे येत नाही तो पर्यंत यावर नियंत्रण येणार नाही, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 25/02/2023 - 08:41
शास्त्रीय अशास्त्रीय भाग फार पुढचा. एखाद्या देशात आपण स्थायिक होतो (कायमचे किंवा तात्पुरते) तेव्हा त्या देशाचे नियम कायदे संकेत पाळणे अनिवार्य असते. ते कायदे शास्त्रीय, अशास्त्रीय आहेत की मानवी, अमानवी आहेत हाही तितकाच वेगळा विषय. तिथे राहता तर कायदे समजून घ्या. पाळा. लहान मुलांवर इतके अत्याचार होतात. अनेकदा घरातच आणि नातेवाईकांकडूनच.. ती मुले नीट सांगूही शकत नाहीत. आयुष्यभर मनावर व्रण घेऊन राहतात. एखादा देश जर त्याबाबत इतका जागरूक असेल आणि नो टोलेरेन्स धोरण अवलंबत असेल आणि शंकेला जराही वाव न ठेवता काळजी घेत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याऐवजी त्याच्याकडून शिकले पाहिजे. असे मत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्यापैकी बरेच असेच न्हाऊ-माखू घालूनच लहानाचे मोठे झाले आहेत आणि हे प्रकार अवैज्ञानिक असते आणि त्याचे केवळ तोटेच असते तर आतापर्यंत भारतातील सगळ्या पिढ्या नेस्तनाबूत व्हायला हव्या होत्या, किमान रोगट तरी बनायला हव्या होत्या. तस्मात याला अजून तरी काही आधार नाही. असो. ज्यांना भारतातून बाहेर जायचे आहे त्यांनी भारत फक्त मनात ठेऊन तिथे रहावे. तिथले कायदे कानून पाळावेत हे उत्तम. इतकीच जर भारतीय परंपरांची चाड असेल तर भारतातच रहावे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मित्रहो 25/02/2023 - 17:22
माझ्या माहितीप्रमाणे Sensory Development साठी मालिश गरजेची असते. ती करण्याची पद्धत असते. शहरात हल्ली ते काम करणाऱ्या स्रिया मिळत नाहीत म्हणून मग भांडे घासणारी सुद्धा हे काम करते. ती भांडे घासल्यासारखेच रगडते त्याने नुकसान होते. मला तर वाटते याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणाऱ्या संस्था हव्यात. माझ्या मुलाला Sensory समस्या होत्या तेंव्हा डॉक्टरांनी मालिश करायला सांगितली होती. नक्की काय करायचे हे त्यांनी माझ्या बायकोला समजावून सांगितले होते. त्यात हाताने हलकेच मालिश करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कापड (मलमल, कॉटन वगैरे) अंगावरुन फिरविणे असे बरेच प्रकार होते. आता पूर्ण आठवत नाही. आणि हो डॉक्टर न्यूरॉलॉजिस्ट होते. सर्वच डॉक्टर हीच ट्रिटमेंट देतील असे नाही.

गवि 25/02/2023 - 09:23
भारतीय परंपरा हा विषय वेगळा आहे. आपण कदाचित १०० टक्के गृहीत धरत आहोत की भारतीय पद्धतीने न्हाऊ माखू घालणे यामुळे हा प्रकार घडला आहे. मिलॉर्ड, दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत जे अण्णांनी लेखात मांडले आहेत. एक. या आधीही (किरकोळ) जखमी होण्याची घटना घडली होती. दोन. बाळाला झालेली इजा गंभीर स्वरूपाची होती. तीन. या इजेचे कारण नीट न सांगता आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार कारवाई केली म्हणजेच स्पष्टीकरण देण्याची पूर्ण संधी दिली गेली होती हे स्पष्ट होते आहे. जर्मनीसारख्या देशात अशी संधीच मिळणार नाही असे वाटत नाही. तरीही त्या जखमेबद्दल जे स्पष्टीकरण दिले गेले ते अर्थातच डॉक्टरांना पटले नाही, म्हणजे ते न जुळणारे किंवा तार्किक नसणार असे म्हणायला जागा आहे. एखादा देश परदेशीय स्थलांतरितांची मुले स्वतःच्या कस्टडीत सरकारी खर्च वाढवून ठेवून घ्यायला कशाला प्रयत्न करतील. आणखी एक. स्थानिक जर्मन मुले अशाच कारणासाठी कस्टडीत घेतली जात नाहीत का? असणारच.

In reply to by गवि

अध्यक्ष महोदय, मी आपलं एका गोष्टीकड़े लक्ष वेधू इच्छितो. आजी जर्मनीला ज्या विविध कारणासाठी गेली त्यात न्हाऊ माखु घालणेही असावे, पारंपरिक पद्धत आहे त्यात अशा जखमा होत नाहीत, तसे काही वाचनात नाही. हं जे भविष्यकाळात फटके बसतात उदा. नाक बसके असणे वगैरे. पण ते त्यामुळेच की नैसर्गिक याचा विदा नाही पण हं आता जे घडले ते अपघाताने घडले असावे, असे जर असेल ते वेगळे. पण मुख्य विषय न्हाऊ-माखु घालणे आणि ते अवैज्ञानिक आहे की कसे आणि त्यामुळे असेल तर आणि तसे कायदे आपल्याकडे झाल्यास बरीचसही बालकं सरकारकड़ेच वाढतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 25/02/2023 - 11:14
इजा गंभीर स्वरूपाची असणे आणि लैंगिक अत्याचाराचा संशय डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांना येणे, हा तपशील लक्षात घ्यावा. नुसती लचक, मुरगळणे नसावे. आणि ज्या कारणाने ते घडले असा दावा पालक करत आहेत ते इजेच्या स्वरुपाशी आणि गांभीर्याशी जुळत नाही असे कायदेशीर ओथोरिटी म्हणत आहे. मामला हलक्यात घेऊन मूल परत देणे योग्य होईल का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१. शास्त्रीयता/अशास्त्रीयता वि पारंपारिक ज्ञान : टाळू भरणे- माझ्या अल्प वाचनानुसार बाळाच्या मेंदूच्या वाढीला वाव असावा म्हणून बाळाच्या कवटीची हाडे घट्ट जोडलेले नसतात. (इथले डॉक्टर अधिक सांगू शकतील). ती नैसर्गिकतः बाळ जसं जसं मोठं होतं तशी भरत जाते. परंतु आपल्या इथं हे प्रसूतिपश्चात बाळाच्या डोक्यात खोबरेल तेलाने टाळू भरायलाच पाहिजे असा हट्ट असतो. काजळाविषयी: डोळ्यात सुरमा केवळ बाळालाच घालायचा नाही तर तो सगळ्यांनाच घालायचा आहे. चरकसंहितेत सकाळी नस्य वगैरे करून, सुरमा वगैरे लावून धूमपान करायचे आहे. हे सगळ्यांनी करायचे असे तर स्पष्ट सांगितले आहे. (परंतु आताच्या हिंदुत्त्वाच्या डेफिनेशनमध्ये सुरमा बसत नाही हा भाग अलाहिदा) मला वाटतं हा रेग्युलर करायचा विधी असल्याने आणि बाळाच्या बाबतीत काही विधी हे ठरवून पाळले जात असल्याने बाळाच्या दिनक्रमात येऊन बसला असावा. काजळात घालायला आजकाल नैसर्गिक कापूर मिळत नाही. बाळाचे डोळे काजळाविनाही चांगले राहतात. काजळाने झालाच तर त्रासच होतो. नजर लागते म्हणून तीट लावणे हे तर अशास्त्रीयच आहे. धुरी देणे - नॉर्मली एका पात्रात कोळसा घेऊन त्यावर उद/कापूर वगैरे घालून धुरी देतात. मी मात्र या धुरी देण्याचा अट्टाहासापायी बाळाला स्वयपाकाघरातल्या इलेक्ट्रीक शेगडीवर धुरी देण्याचा प्रकार पाहिला आहे. तोही युरोपस्थ भारतीयाच्या घरी. हे जर बालसंरक्षण अभिकरणाने पाहिलं तर पालकांवर गुन्हा दाखल झालाच असता. पारंपारिक ज्ञानाबद्दल भारतीय मात्र सगळंच पाळत नाहीत असं दिसतं. स्तनदा मातेने उसापासून बनवलेली दारू प्यावी म्हणजे दूध भरपूर येते असंही पारंपारिक ज्ञान सांगतं. मी मात्र पालक उसाची दारू मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत नाही असं दिसतं. अशा सिलेक्टीव्ह पारंपारिक ज्ञानापायीच चटर्जींची बाळं नॉर्वे सरकारने ताब्यात घेतली होती. त्यामुळे हा ही मुद्दा आहेच. २. बाळाला इजा ते हातातून निसटल्याने झाली होती झाली होती असं मला ऐकीव ठाऊक आहे. चेंज.ऑर्ग च्या पिटीशनमध्येही हे वाचल्याचं स्मरतं. डॉक्टरांना इजेचे कारण सांगता न आल्याने डॉक्टरांनी कारवाई केली. नंतर रामायण झाल्यावर मग आजीने कन्फेशन दिलंय. झाला प्रकार दुर्दैवीच आहे, त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. बर्लिनमध्येच निर्वासित लहान मुली भीक मागतानाही दिसतात. अगदी भारतात असते तसे काही निर्वासित बायका मेट्रोमध्ये तान्ही बाळं घेऊन भीक मागताना दिसतात. हा ही एकाप्रकारे गुन्हाच आहे. त्या सगळ्यांनाच कस्टडीत टाकलं जातं असंही नाही. नॉर्वेमध्ये अशा गोष्टी दिसत नाहीत. स्कँडेनॅव्हियन देशांमध्ये मुलांच्या हक्कांविषयी जरा जास्तच जागरूकता आहे. खूप वर्षांपूर्वी पाहिलेला "द हंट" हा Mads Mikkelsen या नटाचा एक अप्रतिम चित्रपट आठवला. चित्रपट सायकोलॉजिकल ड्रामा आहे पण, लहान मुलांशी केलेल्या सहज वर्तनातून एखाद्याचे आयुष्य कसे उध्वस्त होते हे पाहण्यासारखं आहे.

In reply to by गवि

एका बातमीनुसार वरील फॉस्टर सर्विसेसचा खर्च त्या पालकांकडून वसूल केला जात आहे. ती बीलं हजारो युरोंची आहेत.

कंजूस 25/02/2023 - 11:41
कित्येक पिढ्या सुरू आहे. अचानक एखादी बाई 'दाई'/'सुईण' होत नसते. ती दुसऱ्या अशा अनुभवी बाईबरोबर जात राहाते (उमेदवारी करते) आणि तंत्र शिकून घेणे. ते शिक्षण पुस्तकं वाचून घेतलेले नसते. आता प्रदेशात सहा सहा महिने टुरिस्ट विजावर जाऊन पैसे मिळवण्याचा उद्योग काहींना जमला आहे. त्यांना इंग्रजी/इतर परदेशी भाषा बोलणे,विमानप्रवास करणे हे तंत्र जमले आहे.

तर्कवादी 26/02/2023 - 20:43
नक्की कुठली घटना आहे ? चित्रपटाचे शीर्षक "मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे" असं आहे.. वर जर्मनीचीही चर्चा आहे.नक्की कुठली घटना आहे. असो.. पण एकुणातच अशी घटना अतिशय दुर्मिळच असावी. यापुर्वी कधी अशी कोणती घटना ऐकण्यात / वाचनात आली नाही. जर्मनीत तर भारतीय मोठ्या संख्येने असणार.

सर टोबी 26/02/2023 - 21:23
नियम काटेकोरपणे पाळावेत याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु एकात्मता आणि वैविध्य - इन्कलुसीव्हीटी अँड डायव्हर्सिटी - च्या जमान्यात तरी काही तारतम्य असावे अशी अपेक्षा अगदीच गैर नसावी. नॉर्वेमध्येच एक आज्जी नातवाला हाताने खाणं भरवतांना एका शेजाऱ्याने पहिले आणि त्याची तक्रार केली असता पोलिसांनी त्या बाळाची कस्टडी काढून घेतल्याची बातमी वाचनात आली होती.

चित्रगुप्त 26/02/2023 - 22:44
याप्रकारचे, पण जरा वेगळे असे 'खोब्रागडे प्रकरण' काही वर्षांपूर्वी खूप गाजले होते. अशी सावजे हेरण्याचे काम विविध देशातली बेरकी वकील मंडळी करत असतात, आणि त्यातून बक्कळ पैका मिळवत असतात, हे वेळोवेळी उघड झालेले आहे. खुद्द माझ्यावर, माझी कोणतीही चूक नसता अमेरिकेत येऊ घातलेल्या अश्या एका संकटातून थोडक्यात बचावलो होतो. त्यातली दुखःद बाजू म्हणजे ते संकट एका कचखाऊ, दीडशहाण्या मराठी पुणेकरामुळे ओढवले होते.

तुर्रमखान 27/02/2023 - 00:26
पाशात्यदेशात आणि भारतात प्रचंड कल्चरल फरक आहेत. त्यामुळे तिथे दीर्घकाळ वास्तव्याचा अनुभव नसणार्‍यांना हे कायदे आणि नियम कै च्या कै आहेत असं वाटतं. अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांच्या तोंडाकडे बघण्याची सवय असते. बस असो, दुकान असो किंवा इतर गर्दीची ठिकाणं. ही सवय आपल्या लक्षात देखिल येत नाही. नुसतं अश्या बघण्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. माझ्या अगदी माहितीतलं एक उदाहरण. एका मित्राचे वडील भारतातून उसगावात गेले होते. जाताना ते लोकांच्या लॉन मध्ये, घरांकडे उत्सुकतेने बघत. दुसर्‍याच आठवड्यात एकाने पोलिसांना फोन केला. आपल्याकडे हे अतिशय नॉर्मल आहे पण तिथे लोकांना रेकीचा संशय आला. हिरव्या देशात बर्‍याच काळ रहाणार्‍यांना हे कारण पटेल पण इतर भारतीय लोकांना पटणार नाही. बाकी लहान मुलांच्या बाबतीत काही म्हणणं नाही. जिथे जातो तिथले कायदे पाळले पाहिजेत. इअर पिअर्सिंग सुद्धा आक्षेप घेतला जाउ शकतो. पण आता बर्‍याच देशात या रिच्युअल बद्दल माहिती आहे.

In reply to by तुर्रमखान

चौकस२१२ 27/02/2023 - 08:07
तुर्रमखान सहमत ... इअर पिअर्सिंग सुद्धा आक्षेप घेतला जाउ शकतो शाळेत ममुलं असताना त्यावर निर्बंध आहेत पुढे फारसे नाहीत ... Presentation Requirements 1. Wear their uniform with pride and as outlined in the क्ष्क्ष्क्ष्क्ष section while at school, travelling to and from school and when representing the school or wearing the school uniform in the community. 2. Look natural, neat, tidy and conservative in presentation. For example:  Make – up and eye lash extensions are not allowed  Nails – clear polish only, safe length & no artificial nails  Piercings – lower ear lobes only (clear earrings, band aids or hair cannot be used to cover piercings)  Earrings – one pair of small, fine, plain round silver or gold sleepers or studs (Girls only)  Tattoos – not allowed  Watches – functional rather than decorative  Other jewellery – not allowed  Hairstyles – natural colour,  tied up if it touches the collar using a plain band & school ribbon, at the base of the neck so that the hat can be worn correctly.  off the face  minimum number two (2) blade  no tracks, undercuts or dramatic differences in length between top and sides of the hair  Shaving – students must always be clean-shaven  sideburns are to be no longer than half-way down the ear. Exemptions from above may be granted on medical, religious or cultural grounds but must be supported by appropriate documentation to the Head of Year and then approved by the Year Level Deputy Principal.

चटर्जी व. नॉर्वे या चित्रपटात जी केस मांडली गेली आहे त्याविषयी मी अधिक डिग केले असता एक मुद्दा सामोरा आला. १. नॉर्वेचे बालसंरक्षण अभिकरण कायद्यान्वये कोणत्याही केसमधल्या गोष्टी जाहीर सार्वजनिक करू शकत नाही. २. आपल्याला जे कळते ते फक्त पालक आणि पालकांची बाजू मांडणारे वकील जे सांगतील तेच, म्हणजे एकच बाजू. Dagbladet नावाच्या नॉर्वेजियन न्यूजपेपर मध्ये चटर्जींच्या वकीलांनी काही गोष्टी उघड केल्या ज्या चर्टजी जाहीररित्या सांगत नाहीत. अर्थात ते वकील याहून वाईट गोष्टी सांगणार नाहीतच. १. चटर्जी आपल्या मुलांना बहुतेकदा दहीभातच खाऊ घालत होत्या. २. थंडीच्या मोसमातही मुलांना अजिबात मोजे घातलेले नसत ३. चटर्जींना स्तनपान कसे करावे हे कळत नव्हते ४. चटर्जी मुलांच्या भावनिक गरजांप्रति सजग नव्हत्या. त्या मुलांशी कोल्ड आणि डिस्टंट वागत ५. अंगणवाडीच्या शिक्षिकेने चटर्जी यांना मुलाला मारताना पाहिले. ६. अंगणवाडीतून आपल्या मुलीला घरी नेताना त्या मुलीशी रफ वागल्या.. इत्यादी.. जर्मनीच्या केसमध्येही मी केसमधले तपशील हळू हळू गळताना आणि निष्पाप पालक विरूद्ध बर्लिन बालसंरक्षण अभिकरण असे बनताना पाहत आहे. नॉर्वेची बालसंरक्षण संस्था मात्र धुतल्या तांदळासारखी आहे असं नाही. बी बी सी ने दाखवलेले एक विदारक सत्य -

चौकस२१२ 27/02/2023 - 07:58
अण्णा आपल्या म्हण्याशी बर्यापैकी सहमत .. दोन भिन्न संस्कृती एकमेकांच्या साथीत आल्या कि हे होणारच हे दुर्दैव .... ( मग त्यातून गैरसमज किंवा अन्याय ) मग यात कोण श्रेष्ठ आणि कोण नाही असले फुकाचे वाद घातले जाणार हे दुर्दैव शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन जगावे हे उत्तम त्याने वाईट तरी होणार नाही असे वाटते ... अर्थात हे कधी कधी अवघड होते खास करून जेथे धर्माचा अति पगडा असतो तिथे इस्लामोफोबिया चा आरोप होईल हे मान्य करून एक नमूद करावे वाटते ते म्हणजे वर्षभरातुन एकदम अचानक अतियशय निर्जळी उपवास तो सुद्धा अतिशय गरम प्रदेशात आणि दिवसभर पाणि सुद्धा न पिता करणे शास्त्रीय दृष्ट्या शरीरास कितपत योग्य आहे याची शंका आहे पण काय करणार ... धर्म / परंपरा सांगते म्हणून हे असेच करा असे जिथे सरकारला सुद्धा वाटते तिथे कसे जुळवून घ्यायचे ? अर्थात अश्या प्रथा इसलामेतर धर्मात पण असतील

जैसा देस वैसा भेस अन उरफाटे लुगडं नेस. कायदे,कल्चरल फरक समजून घेऊन मगच मुलांना वाढवले पाहीजे. भारतातून जाणारे वयोवृद्ध "आम्हाला पण मुलं झालीच ना!" असा अडमुठा विचार परदेशातल्या मुलांना वारंवार बोलून मानसिक दडपण आणतात.

नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला. संदर्भ असा - 'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे.

कॅलेंडर

आजी ·

चित्रगुप्त 21/02/2023 - 23:51
खरंच, एवढं काहीबाही कालनिर्णयात असतं हे आजच समजलं. बाकी कालनिर्णय आणल्यावर "अरे वा, खूप काही आहे वाचण्यासारखे, वाचले पाहिजे सावकाशीने केंव्हातरी" असं म्हणत ते एकदा भिंतीवर लटकवलं की एकदम पुढल्या वर्षी त्याच्यावरच नवीन टांगत तेच वाक्य दरवर्षी म्हणणारे जे महाभाग असतात त्यापैकी आम्ही एक. आता तर कालनिर्णय वा कोणतेच कॅलेंडर घरात नाही. (अरसिक किती हा मेला) आजींना अजून त्यात गोडी आहे हे थोरच.

नवीन दिनदर्शिका हातात आल्यावर आपला, आवडत्या व्यक्तीचा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कोणत्या वारी येतोय ते पाहून त्याप्रमाणे नियोजन करणे हा अजून एक विरंगुळा. बाकी वर्षभर दुधाचे, पेपरचे खाडे मांडून ठेवणे हा अजून एक उपयोग.

आंबट गोड 22/02/2023 - 12:06
मला ही कॅलेंडर खूप आवडतं. त्याकडे पहात बराच वेळ घालविता येतो. शिवाय डॉक्टरांची अपॉईंटमेंट, बाईला उधार दिलेले पैसे, सासूबाईंच्या गोळ्या जर हळू हळू कमी करत न्यायच्या असतील तर ती नोंद, लग्नाला जायचे असल्यास त्या तारखेवर नोंद, टोचलेली (आणि तिथे ठेवली असली तरच हमखास सापडणारी) सुई, चतुर्थी चा चंद्रोदय, घरातल्यांचे वाढदिवस, काही रिमाईंडर्स.... कॅलेंडरला कित्ती काम असतं! घरातला एक मेंबरच आहे तो!

Trump 22/02/2023 - 13:46
पुर्वी दिनदर्शिका म्हणजे कालनिर्णयच होती. गेल्या काही वर्षात महालक्षमी, दाते पंचांग चांगलेच परिचीत झाले आहे. पुर्वी कालनिर्णयच्या पाठीमागचे लेख वाचायला मजा वाटायची. हल्ली तसले लेख दिसत नाहीत.

आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे. दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.

नर्मदे हर , /;/ .

विअर्ड विक्स ·

In reply to by कंजूस

अनुभव हा थोडक्यात घेतलाय हे खरे आहे. कारण जी सुखानुभूती यात्रेत होते त्याचे शब्दांकन करणे कठीण आहे नि ते प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते. अनेक पुस्तके आहेत. अनेक लोक युट्युबवर विडिओ टाकतात , मी स्वतः यातील काहीसुद्धा पहिले व वाचले नव्हते त्यामुळे मला जरा जास्त कुतूहल वाटले असेल कदाचित. हो परिक्रमेला मय्या उजव्या हाताला ठेवावी. मी मुंबईहून गेलो होतो. हरदा स्टेशनला उतरलो होतो. अनेक ट्रेन आहेत . पण मी कार्यालयातून जावयाचे असल्याने संध्याकाळची १२१३७ पकडली. रात्रौ झोपून सकाळी वेळेत हरदाला. तेथून नेमावारला जावयास आम्ही विक्रम केली कारण आमचा ग्रुप होता . अंदाजे २५-३० किमी. लक्षात असुद्या हरदा हे दक्षिण तटावर आहे व नेमावर उत्तर तटावर . त्यामुळे मय्या चे दर्शन नेमावर घाटाला पोहोचण्याआधीच होते. अनेक जण ओंकारेश्वराहून संकल्प उचलतात . चैत्र महिन्यात अल्प परीक्रमा असते कोणास करायची असेल तर

चौथा कोनाडा 20/02/2023 - 11:47
छान परिक्रमा ! वर्णन वाचताना रमायला झालं. झकास लिहिले आहे. पुढील वेळीस फोटो नक्की टाका. दोन परिच्छेदामध्ये जागा द्या. सुवाच्य होईल.

पर्णिका 25/02/2023 - 01:58
अनुभवकथन आवडले. काही दिवस नर्मदामैय्याच्या किनारी राहायची कल्पना मस्तच... !
त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला.
हे प्लिज सविस्तर सांगणार का ? गेल्या आठवड्यात लॉन्ग वीकेंड असल्याने नवऱ्यासोबत ५-मैलांची ट्रेल/ट्रेक (जी याआधीही अनेकदा केली होती) केली, तर पाय बऱ्यापैकी दुखत होते.

In reply to by पर्णिका

पायास मेहेंदी काढताना ज्या पोझिशन मध्ये बसतो त्याप्रमाणे बसावे. पंचा घेऊन तो दोन्ही पोटऱ्यांभोवती गुंडाळून गाठ गुढग्याच्या मध्ये पुढील बाजूस ठेवावी . एखादी काठी वा सोटा घेऊन तो पंचाच्या वेटोळ्यात अडकवून काठी पुढच्या बाजूस खेचली असता पोटऱ्यांवर उत्तम ताण येतो.

लेख फारच घाईत लिहिल्यासारखा वाटला. इतर नर्मदा परिक्रमेच्या लेखांवर येणार्‍या प्रतिक्रियेत "खाण्यापिण्याची वर्णने जास्त येतात" याच्याशी सहमत व्हावे लागते. पुढील वेळेस असा एखादा अनुभव लिहिताना शांततेने लिहिला तर त्यातील अनुभव अधिक प्रखरपणे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येईल. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !

लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे. पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला.