शशक- निवडणूक २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आधीचा भाग शशक- निवडणूक
आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो.
कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल.
आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी?
कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो.
आबा - काय भाव आहे यावेळी?
कार्यकर्ता- ५०० रुपये.
आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो. मतदानाच्या लाईनीत आबांची नजर चोहीकडे भिरभिरतेय. दूरवर दोन कार्यकर्ते उभे आहेत. त्यातला एक आबांना "किती?" असे खुणावतो. आबा १ बोट दाखवतात. कार्यकर्ता तत्परतेने २ बोटे दाखवतो. आबा खुशीत मिशीवर ताव देत मतदानकेंद्रात शिरतात.
प्रतिक्रिया
वा, मस्त !
कालचा अनुभव...
नाय बा!!